Monday, May 12, 2025

महामुंबई

राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षांमध्ये एकसमानता असावी

राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षांमध्ये एकसमानता असावी

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना महामारी नियंत्रणात आल्यामुळे राज्यातील विद्यापीठांनी ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचे ठरविले आहे. मात्र विद्यापीठांच्या परीक्षा घेण्याच्या पद्धतीनंमध्ये समानता नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यामुळे राज्यातील विद्यापीठांमध्ये परीक्षा घेण्याच्या पद्धतीत एकसमानता असावी, वेळेवर निकाल लावावे या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.


देशातील इतर सीईटी परीक्षांच्या तयारीसाठी आणि परदेशी विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सोयीचे व्हावे. यासाठी राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आणि कुलगुरूंना भेटून निवेदन दिली आहेत. आंदोलने केली आहेत. मात्र, तरीही काही विद्यापीठ वेगवेगळी भूमिका जाहीर करत असल्याने भ्रमाचे वातावरणामुळे ११ विद्यापीठातील विद्यार्थी प्रतिनिधींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे, असे याचिकाकर्ते कल्पेश यादव आणि प्रा. बालुशा बाशल यांनी सांगितले.


प्रा. बालूशा बाशल यांनी सांगितले, की सर्व अकृषी विद्यापीठासह इतर विद्यापीठांचे कुलगुरू समवेत उच्च शिक्षण मंत्र्यानी परीक्षांचे नियोजना संदर्भात बैठक घेतली होती. परीक्षेचे नियोजन कसे करावे त्यातच परीक्षांमध्ये एकसमानता असणार, विद्यार्थ्याना प्रश्नपत्रिका संच उपलब्ध करुन देणार, परीक्षांचे नियोजन लवकर करुन निकाल वेळेवर लावणे यांसह इतर मुद्दयांवर या बैठकीमध्ये सर्व कुलगुरुंनी एकमताने ठराव मान्य करत परीक्षांचे नियोजन करण्याचे निश्चित झाले.


मात्र, वेळेवर निकाल प्रसिद्ध करण्याचे कारण पुढे करत नागपूर विद्यापीठासह इतर २ विद्यापीठांनी ऑफलाइन एमसीक्यू पद्धतीने परीक्षेचे नियोजन जाहीर केले आहे. मात्र, इतर विद्यापीठ हे ऑफलाइन पद्धतीने नियोजन करणार आहेत. अनेक विद्यापीठाने विद्यार्थ्यांना आजपर्यंत प्रश्नपत्रिका संच उपलब्ध करुन दिलेली नाही.

Comments
Add Comment