Thursday, May 22, 2025

रायगड

माथेरानमध्ये दोन दिवस अश्व शर्यतीचा थरार

माथेरानमध्ये दोन दिवस अश्व शर्यतीचा थरार

नेरळ (वार्ताहर) : माजी नगराध्यक्ष प्रदीप दिवाडकर यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या माथेरान युथ सोशल क्लब कडून पर्यटकांसाठी पर्वणी ठरेल अशा अश्व शर्यती येत्या शनिवार आणि रविवारी माथेरान क्या ओलपिया रेस्कोर्स मैदानावर होणार आहेत. माथेरान गिरिस्थान नगर परिषद गेली काही वर्षे या अश्व शर्यतींना पालिकेचे प्रोत्साहन देत सहभागी होत असतात. २८ आणि २९ मे रोजी या अश्व शर्यती होणार असून अश्व शर्यती बरोबर अनेक स्पर्धा आयोजित केल्या जातात.


माथेरान हे जागतिक दर्जाचे सुंदर पर्यटनस्थळ असून उन्हाळ्यात थंड हवा, हिवाळ्यात गुलाबी थंडी आणि पावसाळ्यात धुक्यात दाटलेले माथेरान अनुभवण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक माथेरानला येत असतात. उन्हाळी पर्यटन हंगामात मे महिन्यात माथेरानमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना आणि स्थानिक घोडेस्वार यांच्यासाठी माथेरान नगर परिषद आणि माथेरान युथ सोशल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने या अश्व शर्यती आणि खेळांचे आयोजन करण्यात आले आहे.


दोन दिवस चालणाऱ्या अश्व शर्यतीमध्ये गॅलपिंग, ट्रॉटिंग, म्युझिकल बॉल अँड बकेट, सडलिंग युअर हॉर्स, टग ऑफ वॉर, गॅलपिंग गोल्फ ऑन हॉर्सबॅक म्युझिकल मग्स ऑन हॉर्सबॅक, टॅट पेंगिंग तसेच येथील आदिवासी घोडेस्वार तसेच स्थानिक आदिवासी यांच्या धावण्याची शर्यत लहान मुलांसाठी सॅक रेस, मुले आणि मुली यांच्यासाठी फ्लॅट रेस आणि पर्यटकांसाठी रिले रेस आदी स्पर्धा आयोजित केल्या आहेत.

Comments
Add Comment