
जालना : मुंबई, ठाणे, पुणे आणि पालघर या ठिकाणची कोरोनाची वाढती रुग्णसंख्या विचार करायला लावणारी आहे. मास्कची सक्ती नसली तरी जनतेने काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता काही भागाची काळजी नक्कीच घ्यावी लागेल. मुंबई, ठाणे, पुणे आणि पालघर या ठिकाणची वाढती रुग्ण संख्या विचार करायला लावणारी आहे, असं राजेश टोपे म्हणाले. ते आज जालन्यात बोलत होते.
कोरोनाची परिस्थिती बघता त्यासाठी टेस्टिंगची संख्या वाढवण्याची गरज आहे. म्हणून टेस्टिंग वाढवण्याचा निर्णय घेत आहोत, असंही राजेश टोपेंनी सांगितलं. मास्क सक्ती बाबत जरी सक्ती नसली तरी नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. ज्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे, त्या भागातील टेस्टिंग वाढवण्यासाठी आरोग्य विभागाला सूचना केल्या गेल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं.