नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत २६८५ नवीन रुग्ण कोरोनाग्रस्तांची नोंद झाली असून ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १६ हजार ३०८ वर पोहोचली आहे.
कोरोनाचे रुग्ण वाढवण्याचे प्रमाण ०.०४ टक्के असल्याचे देखील आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. मागील २४ तासांमध्ये झालेल्या ३३ मृत्यूनंतर देशातील एकूण कोरोना मृतांचा आकडा ५ लाख २४ हजार ५७२ झाला आहे. तर कोरोना रुग्णांचा आजपर्यंतचा आकडा ४ कोटी ३१ लाख ५० हजार २१५ झाला आहे.
राज्यातही कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय. एप्रिलपासून मुंबई आणि पुण्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय. त्यामुळे कोरोनापासून बचावासाठी मास्कचा वापर करण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आठवड्यात कोरोना संसर्गाचा रेट मुंबईत ३.१७ टक्के आणि पुण्यात २.१६ टक्के आहे. कोरोनासंर्गाचा हा दर जास्त आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये ५३६ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत.
४ कोटी २६ लाख ९ हजार ३३५ जण आजपर्यंत कोरोनातून बरे झाले आहेत. आजपर्यंत देशात १९३ कोटी १३ लाख लसीकरणाचे डोस देण्यात आल्याची माहिती, पीआयबीने दिली आहे.