Monday, July 15, 2024
Homeदेशवादग्रस्त आयएएस दाम्पत्याची तडकाफडकी बदली

वादग्रस्त आयएएस दाम्पत्याची तडकाफडकी बदली

नवी दिल्ली (हिं. स.) : दिल्लीच्या त्यागराज स्टेडियममध्ये खेळाडूंचा सराव थांबवून श्वानासोबत फिरल्यामुळे वादात सापडलेले आयएएस अधिकारी संजीव खिरवार यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यांची दिल्लीहून लडाखमध्ये बदली केली आहे. तसेच त्यांची पत्नी रिंकू दुग्गा यांची यांचे अरुणाचल प्रदेशात स्थानांतरण करण्यात आले आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने या संदर्भात दिल्लीच्या मुख्य सचिवांकडून अहवाल मागवला होता आणि अहवाल आल्यानंतर गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. त्यागराज स्टेडियममध्ये सराव करणाऱ्या खेळाडूंकडून सतत तक्रारी येत होत्या की, त्यांना संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत सराव संपवण्यास सांगितले जाते. दिल्ली सरकारचे प्रधान सचिव (महसूल) संजीव खिरवार संध्याकाळी ७.३०च्या सुमारास त्यांच्या श्वानासह फिरण्याकरिता दिल्लीच्या त्यागराज स्टेडियममध्ये येत असत. त्यामुळे ७ वाजताच त्याठिकाणी सराव करणाऱ्या खेळाडूंना मैदानाबाहेर काढले जात होते. दरम्यान या साऱ्याबाबत खेळाडू आणि प्रशिक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती.

यापूर्वी रात्री ८.३० पर्यंत ऍथलिट्स सराव करत असत, पण आता ६.३० वाजल्यापासूनच तेथील गार्ड्स शिट्टी वाजवण्यास सुरुवात करतात आणि मैदान मोकळे केले जाते. त्यामुळे आता त्यांना ३ किमीवरील जवाहरनगर स्टेडियममध्ये जावे लागत असे. विशेष म्हणजे संजीव यांचा कुत्रा मैदानात रेसिंग ट्रॅक, फुटबॉलचे मैदान साऱ्यावर फिरत असल्याचेही निदर्शनास आले होते. हा प्रकार समोर येताच दिल्ली सरकारने दिल्लीतील सर्व स्टेडियम रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहतील. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी एका ट्वीटद्वारे ही माहिती दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -