Wednesday, July 24, 2024
Homeमहत्वाची बातमीरेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून म.रे.चा जलसंधारणाचा उपक्रम

रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून म.रे.चा जलसंधारणाचा उपक्रम

पर्यावरणस्नेही उपक्रमामुळे गोड्या पाण्याचा वापर वाचविण्यात मदत

मुंबई (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या पर्यावरण आणि हाऊसकिपिंग व्यवस्थापन विभागाने विविध उपाययोजनांद्वारे पर्यावरणीय शाश्वतता लक्ष्य साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. जलसंधारण, नवीकरणीय ऊर्जा, कचरा व्यवस्थापन, वनीकरणाद्वारे ग्रीन पॅच विकसित करणे इत्यादी संदर्भात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (NGT) आणि रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या नियमांनुसार हे उपाय केले जातात.

जलसंवर्धनाला चालना देण्यासाठी मध्य रेल्वे विविध ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग (RWH) पुरवत आहे. जलद शहरीकरणामुळे जमिनीत पावसाचे पाणी झपाट्याने कमी होत आहे, त्याचप्रमाणे देशाच्या बहुतांश भागात खोदलेल्या कूपनलिकाही पाण्याचे प्रमाण कमी करत आहेत. ज्या भागात पाऊस कमी पडतो तेथे ही समस्या आणखीनच वाढत जाते. या समस्येवर मात करण्यासाठी मध्य रेल्वेने रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये पुढाकार घेतला आहे.

२०२१मध्ये प्रदान केलेल्या २४ रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट्ससह त्याच्या कार्यक्षेत्रातील स्थानके, कार्यशाळा, वसाहती इत्यादी विविध ठिकाणी १५८ रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट्स प्रदान केले आहेत. यापैकी बहुतेक रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट्स भुसावळ आणि सोलापूर विभागातील अवर्षण प्रवण भागात प्रदान केले आहेत. जेथे पाऊस कमी पडतो. या १५८ रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट्सपैकी भुसावळ विभागात ७३ युनिट्स आणि त्यानंतर सोलापूर विभागात ५२ रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट्स आहेत. नागपूर विभागात १९ रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट्स, पुणे विभागात ८ रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट्स आणि मुंबई विभागात ६ रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट्स (माटुंगा वर्कशॉप, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोणावळा येथे प्रत्येकी २) आहेत.

याशिवाय, मध्य रेल्वेने मुंबई विभागात रेन वॉटर हार्वेस्टिंगसह ६ सौर संयत्रे (umbrellas), छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोणावळा येथे प्रत्येकी २, इगतपुरी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे प्रत्येकी एक सौर संयत्र (umbrella) उपलब्ध करून दिले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -