Sunday, October 26, 2025
Happy Diwali

...तर शिवसेना आमदार, खासदार, मंत्र्यांना फिरू देणार नाही

...तर शिवसेना आमदार, खासदार, मंत्र्यांना फिरू देणार नाही

परवानग्या मिळत नसल्याने कामाला होतोय विलंब

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील देवबाग गावाला तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढले असल्याने पावसाळ्यात गावकऱ्यांना जीव मुठीत धरून राहावे लागते. पावसाळ्यात येणाऱ्या समुद्राच्या लाटांमुळे गाव समुद्र गिळंकृत करत चालला आहे. गाव वाचवायचे असेल तर धूपप्रतिबंधात्मक बंधारा आवश्यक आहे. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या खासदार निधीतून बंधारा मंजूर करून भूमिपूजन केले. मात्र या बंधाऱ्यासाठी योग्य त्या परवानग्या मिळाल्या नसल्याचे समोर येत आहे.

त्यामुळे बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या परवानग्या अडवल्याचा आरोप भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी केला आहे. त्यामुळे पावसाळ्यात जर देवबागमधील एकाचा जरी जीव गेल्यास यांच्याविरोधात न्यायालयातून ३०२ चा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडू. शिवाय यांना मालवणातच काय तर जिल्ह्यातही शिवसेना आमदार, खासदार, मंत्र्यांना फिरू देणार नाही, असा इशारा निलेश राणेंनी दिला.

देवबाग गावातील बंधाऱ्याचे काम होऊ नये यासाठी स्थानिक आमदार वैभव नाईक, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना सांगून या कामात अडचणी निर्माण करत आहेत, असा आरोप करत येत्या पावसाळ्यात जर देवबागमधील एकाचा जरी जीव गेल्यास यांच्याविरोधात न्यायालयातून गुन्हा दाखल करण्यास भाग पाडू, असा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे. शिवाय यांना मालवणातच काय तर जिल्ह्यातही फिरू देणार नाही असाही इशारा दिला आहे. आदित्य ठाकरे यांनी वैभव नाईकांच्या सांगण्यावरून परवानग्या अडवल्याचा आरोप निलेश राणेंनी केला.

देवबाग येथील संरक्षक बंधाऱ्याच्या कामासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. याला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली असून प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे. बंधाऱ्याचे काम मार्गी लागावे यासाठी पर्यावरण खात्याची परवानगी आवश्यक आहे. मात्र स्थानिक आमदाराने हे काम राणेंचं असल्याने आदित्य ठाकरे यांना सांगून हे काम थांबवले आहे. खालच्या पातळीचे राजकारण ही लोकं करत आहेत.

त्यांना लोकांचे जीव महत्त्वाचे नाहीत. या कामाला राणेंनी निधी दिला त्यांना तो वापरता येत नये. यासाठी अडचणी निर्माण करण्याचे काम केले आहे. हा राणेंचा विषय नसून देवबागमधील स्थानिक ग्रामस्थांच्या जीविताचा विषय आहे, असेही निलेश राणे पुढे म्हणाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >