पर्यावरण रक्षणाचे दावे – किती खरे?

Share

वसुंधरा देवधर

जगभरात ओट्सपासून उत्पादित केलेली विविध खाद्य-पेये मिळतात. ओटली मिल्क (Oatly milk) हे त्यापैकी एक पेय. या पेयाची जाहिरात यूकेमधील मासिकात आणि नंतर अमेरिकेत टीव्हीवर झळकली. यूकेमधील जाहिरातीत म्हटले होते ‘हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, डेअरी आणि मांसयुक्त उत्पादने आहारातून बाद करणाऱ्या जीवनशैलीचा स्वीकार केला, तर आपण पर्यावरणावर होणारा आघात कमी करू शकतो. (Climate experts say, cutting dairy and meat products from our diets is the single biggest lifestyle change we can make to reduce our environmental impact) वास्तविक अनेक तज्ज्ञांनी असे म्हटले नसून जोसेफ पुरे (joseph poore) या एका तज्ज्ञाचे हे काहीसे बदललेले वाक्य आहे. म्हणजे असे की, जोसेफ महाशयांनी अगदी ठामपणे असा दावा केला नाही. “A vegan diet is probably the single biggest way to reduce your impact on planet Earth.” हे त्यांचे मूळ विधान. त्यात शक्यता वर्तविली आहे. त्यासाठी अन्नप्रक्रिया आणि उत्पादन पद्धतींचा अभ्यास त्यांनी केला होता. मात्र ओटली मिल्कच्या जाहिरातीत ठाम विधान केले आहे आणि अनेक तज्ज्ञांचे ते मत आहे असा आभास निर्माण केला गेला. या जाहिरातीतील दाव्याला आव्हान देणाऱ्या अनेक तक्रारी युकेमधील जाहिरात नियमकांकडे करण्यात आल्या. तो दावा काढून टाकण्यात आला. अमेरिकेतसुद्धा त्याची पुनरावृत्ती झाली.

सद्य परिस्थितीत ग्राहक हवामान बदलाबाबत अधिक जागरूक झालेत आणि आपले खरेदीचे निर्णय घेताना हवामान बदल, पर्यावरण रक्षण याविषयी सजग असतात, हे उत्पादकांनी हेरले आहे.ग्राहकांचा कल, कुठे कसा आहे, त्यावर जाहिराती काय व कसे सांगतात ते ठरत असते. म्हणूनच अनेक वस्तूंच्या माहितीपत्रकात, लेबलवर हे उत्पादन कसे? पयावरणस्नेही पद्धतीने बनविले आहे, हे सांगण्याचे प्रमाण वाढलेले दिसते. पण त्यात तथ्य किती, त्यावर विश्वास किती ठेवायचा याबद्दल आपण ग्राहकांनी सतत दक्ष असायला हवे. आणखी काही उदाहरणांनी हे स्पष्ट होईल. बांबूपासून रेयॉन बनविण्याच्या प्रक्रियेत रसायनांचा बराच वापर होतो आणि प्रक्रियेदरम्यान प्रदूषके निर्माण होतात. तरीही वॉलमार्ट व कोल (kohl) यांनी ‘सदर वस्त्रे बनविताना बांबूवरती करण्यात आलेली प्रक्रिया पर्यावरणस्नेही होती’ असा दावा केला. उचित व्यापार प्रथेचा भंग झाल्याने तो त्यांना मागे घ्यावा लागला आहे.

रसायनयुक्त स्वच्छके ‘ग्रीन वर्क्स’ अशा ब्रँड नावाने बाजारात आणल्यामुळे २०१७ साली Clorox कंपनीला चक्क कोर्टातच खेचण्यात आले होते. थोडे मागे गेलो, तर फोक्स wagan (Volkswagen) या प्रसिद्ध मोटारवाहन उत्पादक कंपनीने आपले वाहन किती पर्यावरणस्नेही आहे आणि त्यामुळे प्रदूषण कसे / किती कमी होते, याचा गवगवा जाहिरातींद्वारे केला होता, त्याची आठवण येईल. वास्तविक त्यांनी एक चलाख उपकरण त्या वाहनात बसविले होते. ज्यावेळी वाहनातून बाहेर येणाऱ्या हवेचे परीक्षण होई, त्यावेळी हे उपकरण कार्यरत होई आणि सगळे आकडे ते वाहन किती पर्यावरणस्नेही आहे, याची साक्ष देत. ही लबाडी बाहेर आलीच आणि आपण फसवणूक केली, हे कंपनीस मान्य करावे लागले.

या सगळ्या प्रकाराला ग्रीन वॉशिंग असे नाव आहे. हे नाव मिळाले ते हॉटेलातील टॉवेल्स धुण्याबाबत जे आवाहन ग्राहकांना केले होते, त्यामुळे. सामान्य माणसाला वाटत असतेच की पर्यावरणरक्षणात आपण सहजपणे निदान खारीचा वाटा उचलू शकलो तर बरे. ही मानसिकता लक्षात घेऊन १९८६ च्या आसपास मोठ्या हॉटेल्समधून असे आवाहन करण्यात आले की, तुम्ही जर एकाहून दिवस आमच्या हॉटेलमध्ये वास्तव्य करणार असाल, तर तुमचे वापरलेले टॉवेल्स आम्ही २/३ दिवसांनी धुवून देऊ. यामुळे साबण आणि पाणी यांच्या वापरात बचत होईल. पर्यायाने पर्यावरण हानी कमी होईल. या प्रस्तावाचे गोडवे गायले गेले आणि ग्राहकांनीही अनुकूल प्रतिसाद दिला. मात्र चिकित्सक पर्यावरणवादी जै वेस्टरवेल्ड (Jay Westerveld) याच्या नजरेस आले की, या टॉवेलबाबत आवाहन करणाऱ्या हॉटेलांचे पर्यावरण प्रेम ग्राहकांच्या जीवावर उभे आहे व त्याचा गाजावाजा केला जातोय. मात्र व्यवस्थापन पातळीवर पर्यावरणपूरक निर्णय आणि अंमलबजावणी यांची बोंबच आहे. त्यातून अशा फसवेगिरीला ग्रीन वॉशिंग हे नाव त्याने प्रथम दिले.

सद्य परिस्थितीत पर्यावरण रक्षणासाठी अनेक प्रयत्न वैयक्तिक, संस्थात्मक व शासकीय पातळीवरून होत आहेत. उत्पादने पर्यावरणाचा ऱ्हास करणारी, ते ओरबाडणारी असू नयेत याविषयी सर्वत्र जागरूकता वाढती आहे. अशी उत्पादने कधी खर्चिक असू शकतात, याची सामान्य ग्राहकाला जाणीव आहे. शक्य तिथे असा खर्च करून पर्यावरण रक्षणास, संवर्धनास हातभार लावायची तयारी, ग्राहक दाखवतात. मात्र हे करताना आपण ग्रीन वॉशिंगला बळी पडत नाही ना? हेही पाहिले पाहिजे.

त्यासाठी काही टिप्स

  • पर्यावरणस्नेही प्रक्रिया, यासारख्या ढोबळ दाव्यांना प्रश्न विचारा, भुलू नका. (“eco-friendly,” “produced
    sustainably”)
  • केवळ तज्ज्ञांना समजेल अशा भाषेतील माहिती समजून घ्या व मगच खरेदी करा.
  • थोडे पर्यावरणस्नेही काम आणि त्याचा खूप डांगोरा, यांपासून सावध असा.
  • आता इंटरनेटवर खूप कंपन्यांची माहिती असते, तिचा योग्य उपयोग करा.
  • आपले अनुभव इतरांना सांगून जागरूकता वाढवा.
  • १००% पर्यावरणस्नेही उत्पादन, म्हणजे नक्की काय/कसे/कोणते?, असे प्रश्न विचारा व त्याचे उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करा.
  • स्थानिक उत्पादने घेण्याने वाहतूक आणि साठवणूक याद्वारे होणारे प्रदूषण कमी होऊ शकते, हे ध्यानात ठेवून खरेदीचे निर्णय घावेत.

रोजच पर्यावरण दिवस आहे, कारण पर्यावरण आमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे, खरंय ना?

mgpshikshan@gmail.com

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

1 hour ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

2 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

2 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

4 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

5 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

5 hours ago