Wednesday, April 30, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

राणा दाम्पत्यामुळे बिल्डिंगमधील सगळेच फ्लॅटधारक गोत्यात

राणा दाम्पत्यामुळे बिल्डिंगमधील सगळेच फ्लॅटधारक गोत्यात

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या मालकीचा फ्लॅट असलेल्या इमारतीमधील सगळ्यांनाच मुंबई महापालिकेने नोटीस पाठवली आहे.

उपनगरातील खार येथे राणा दाम्पत्याचा फ्लॅट आहे. याच फ्लॅटमधून मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला ताब्यात घेतले होते. या फ्लॅटमध्ये अनधिकृत बांधकाम झाल्याने मुंबई महापालिकेने राणा दाम्पत्याला नोटीस बजावली होती. त्याविरोधात राणांनी दिंडोशी न्यायालयात धाव घेतली होती.

राजकीय सूडबुद्धीतून नोटीस बजावण्यात आल्याचा आरोप नवनीत राणा आणि रवी राणांनी केला होता. तसेच बिल्डरने ताबा दिल्यापासून आपण कोणतेही बांधकाम केले नसल्याचे राणा यांनी सांगितले होते. त्यानंतर आता महापालिकेने इमारतीमधील सर्वच फ्लॅटधारकांना नोटीस बजावली आहे. सगळ्याच फ्लॅट्सचे ऑडिट पालिकेकडून केले जाणार आहे. त्यामुळे राणांसोबतच इमारतीमधील सगळ्याच रहिवाशांच्या अडचणी वाढल्या आहेत.

दरम्याम, दोनच दिवसांपूर्वी खार येथील घरासंदर्भात दिंडोशी न्यायालयाकडून राणा दाम्पत्याला अर्ज करण्यास १ महिन्याची मुदत देण्यात आली आहे. तसेच पुढील आदेशापर्यंत कारवाई न करण्याच्या सूचनाही न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला दिल्या आहेत. नवनीत राणा आणि रवी राणा यांना मुंबई महानगरपालिकेने खार येथील घराचे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या दोघांनीही न्यायालयात धाव घेतली. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने आता राणा दाम्पत्याला एक महिन्याची मुदत दिली आहे.

Comments
Add Comment