Saturday, March 15, 2025
Homeमहत्वाची बातमीकोरोना वाढतोय, मास्क वापरा

कोरोना वाढतोय, मास्क वापरा

मुख्यमंत्री ठाकरे यांचे आवाहन

मुंबई : कोरोना रुग्णांमध्ये संथपणे वाढ दिसत असून राज्यातील जनतेने मास्क वापरत रहावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून जनतेला केले आहे. मुंबईत रुग्णसंख्येत ५२.७९ टक्के वाढ झाली असून ठाण्यामध्ये २७.९२ टक्के तर रायगडात १८.५२ टक्के आणि पालघर जिल्ह्यात ६८.७५ टक्के इतकी वाढ झाली आहे. राज्याची साप्ताहिक पॉझिटीव्हीटी १.५९ टक्के असून मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त पॉझिटीव्हीटी आढळते.

सध्या केवळ एक रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १८ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या कमी असली तरी कोरोना पूर्णपणे गेलेला नाही हे लक्षात घेऊन सर्वांनी सावधगिरी बाळगणे आणि त्यासाठी मास्क घालत राहणे, लस घेणे आवश्यक आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. सध्या १८ पेक्षा अधिक वयाच्या ९२.२७ टक्के लोकांना एक डोस देण्यात आला आहे. चाचण्यांचे प्रमाणही कमी झाले असून ते वाढविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -