फुटीरतावादी यासिन मलिकला अखेर जन्मठेप

  96

नवी दिल्ली : काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी एनआयए कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. यासिन मलिक याने याआधीच काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली होती. त्यानंतर एनआयए विशेष कोर्टाने १९ मे रोजी त्याला दोषी ठरवले होते. आज एनआयए कोर्टात शिक्षेवर सुनावणी झाली. एनआयएने यासिन मलिकला फाशीच्या शिक्षेच्या मागणी केली होती. यासिन मलिकविरोधात देशविरोधी कारवायांचा आरोप होता. मलिक विरोधात 'युएपीए' कायद्यातील कलमांसह इतरही अनेक गुन्हे दाखल आहेत.


यासिन मलिक विरोधात युएपीए कायद्यातील कलम १६ (दहशतवादी कायदा), १७ (दहशतवादी कृत्यासाठी निधी उभारणे), १८ (दहशतवादी कृत्य करण्याचा कट) आणि २० (दहशतवादी टोळीचा सदस्य) आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याशिवाय, भारतीय दंड विधान कायद्यातील १२०-ब (गुन्हेगारी कट) आणि १२४-अ (देशद्रोह) आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.


यासिन मलिकने जम्मू-काश्मीरच्या स्वातंत्र्य लढ्याच्या नावाखाली जगभरातून बेकायदेशीर आणि दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारला असल्याचे कोर्टाने याआधी म्हटले होते. कोर्टाने काश्मीरमधील फुटीरतावादी नेता फारुख अहमद उर्फ बिट्टा कराटे, शाबीर शाह, मसरत आलम, मोहम्मद युसुफ शाह, आफताब अहमद शाह, नयीम खान, मोहम्मद अकबर खंडय, राजा मेहराजुद्दीन कलवाल, बशीर अहमद भट, झहूर अहमद शाह वातली, शबीर अहमद शाह, नवल किशोर कपूर आदींविरोधात आरोप निश्चित केले आहेत. त्याशिवाय लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद आणि हिज्बुल मुजाहिद्दीन संघटनेचा म्होरक्या सल्लाउद्दीन विरोधातही आरोप निश्चित केले आहेत.

Comments
Add Comment

गुरुग्राममध्ये साकारणार भारतातील पहिले ‘डिस्नीलँड’

नवी दिल्ली : हरियाणा सरकारने देशातील पहिले ‘डिस्नीलँड-शैली’चे थीम पार्क गुरुग्रामजवळ उभारण्याचा

अमरनाथ यात्रेत ५० हजार भाविकांनी घेतले दर्शन

जम्मू :अमरनाथ यात्रेच्या पहिल्या ४ दिवसांत ५० हजारांहून अधिक भाविकांनी पवित्र गुहेतील बर्फाच्या शिवलिंगाचे

देशातील गरिबीचा दर घसरला

२०११ पासून १७ कोटी भारतीय लोक गरिबीतून आले बाहेर नवी दिल्ली : भारत जगातील चौथ्या क्रमांकाचा समान समाज बनला आहे.

CA Exam Result: सीए परीक्षेचा निकाल जाहीर; मुंबई-ठाण्याच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

सीए अंतिम परीक्षेत मुंबईचा 'टॉपर' मुंबई: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय)कडून मे २०२५

'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तान हादरला! भारतावर नजर ठेवण्यासाठी चीनकडून खरेदी करणार KJ500 रडार

नवी दिल्ली: भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानला हादरवून टाकले आहे. भारतीय सैन्याच्या आक्रमक तयारीने आणि

Terrorist hideout destroyed: पुंछमध्ये दहशतवादी अड्डा नष्ट, शस्त्रसामुग्री जप्त

सुरनकोट जंगलात लष्कर-पोलिसांच्या संयुक्त कारवाईत शस्त्रसाठा सापडला; किश्तवाडमध्ये स्वतंत्र दहशतवादविरोधी