Sunday, January 19, 2025
Homeक्रीडामहिला गोलंदाज मायाची अजब अॅक्शन चर्चेत

महिला गोलंदाज मायाची अजब अॅक्शन चर्चेत

पुणे (प्रतिनिधी) : महिला टी-२० चॅलेंज म्हणजेच महिला आयपीएल सुरू झाले आहे. या स्पर्धेत एकूण चार सामने होणार आहेत. आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यांमध्ये अनेक खेळाडूंनी आश्चर्यकारक कामगिरी केली असली तरी सर्वाधिक चर्चा माया सोनवणे हिची आहे.

आयपीएल २०२२ मध्ये महिला टी-२० चॅलेंजचे सामनेही सुरू झाले आहेत. ही ४ सामन्यांची लीग सुपरनोव्हास, ट्रेलब्लेझर्स आणि व्हेलॉसिटी यांच्यात खेळवली जात आहे. सुपरनोव्हासने पहिल्या सामन्यात ट्रेलब्लेझर्सचा ४९ धावांनी पराभव केला; परंतु दुसऱ्या सामन्यात त्यांना व्हेलॉसिटीविरुद्ध ७ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. सुपरनोव्हास आणि व्हेलॉसिटी यांच्यातील दुसऱ्या सामन्यात माया सोनवणे या महाराष्ट्राच्या खेळाडूला खेळण्याची संधी मिळाली आणि तिची गोलंदाजी प्रसिद्धीच्या झोतात आली.

व्हेलॉसिटीकडून खेळणारी माया सोनवणे लेगस्पिन गोलंदाजी करते. गोलंदाजी करताना तिचे डोके खाली जाते. ती तिच्या गुडघ्यात खूप वाकते. ११व्या षटकात कर्णधार दीप्ती शर्माने मायाला पहिल्यांदा गोलंदाजी दिली. पहिला चेंडू टाकताच ती चर्चेचे केंद्र बनली. मात्र तिला गोलंदाजीत काही चमत्कार करता आला नाही. दोन षटकांत १९ धावा दिल्यानंतर कर्णधार दीप्तीने तिला पुन्हा गोलंदाजीची संधी दिली नाही.

महिला सीनिअर टी-२० ट्रॉफीमध्ये केलेल्या शानदार गोलंदाजीमुळे या महिला टी-२० चॅलेंजमध्ये स्टार खेळाडूंसोबत खेळण्याची संधी तिला मिळाली आहे. महाराष्ट्राचा संघ सीनिअर टी-२० ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. त्या स्पर्धेत मायाने ८ सामन्यांत ११ विकेट घेतल्या होत्या. सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ती दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -