Friday, December 13, 2024
Homeमहामुंबईपनवेल महानगरपालिका उभारणार इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन्स

पनवेल महानगरपालिका उभारणार इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन्स

महिला बालकल्याण, दिव्यांग, समाजविकास विभागासह विविध विषयांना मंजुरी

पनवेल (वार्ताहर) : महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरास प्रोत्साहन देणे, पर्यावरणाचा समतोल राखण्याच्यादृष्टिने व प्रदूषण कमी करणे तसेच हवेचा दर्जा सुधारणेच्या दृष्टिने पनवेल महानगरपालिका हद्दीत इलेक्ट्रीक वाहनांना चार्जिंग करण्यासाठी चार्जिंग स्टेशनची उभारणी करण्याच्या विषयाची माहिती उपायुक्त कैलास गावडे यांनी आज महासभेत दिली. पालिका सदस्यांनी या विषयास मंजूरी दिली.

त्यानुसार, मालमत्ता विभागामार्फत महानगरपालिकेच्या प्रभाग समिती निहाय प्रभाग समिती अ,ब,क,ड येथे महामार्गालगत ०५ भुखंड निश्चित झाल्यानंतर त्या ठिकाणी रेव्हेन्यु शेअरिंग बेसीस या तत्वावर ठेकेदारामार्फत इलेक्ट्रीक वाहनांकरीता चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत.

महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे महासभा घेण्यात आली. यावेळी उपमहापौर सीताताई पाटील, महापालिकेचे सर्व सदस्य, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, नगरसचिव तिलकराज खापर्डे, पालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महासभेने विविध विषयांना दिली मंजुरी

पनवेल महापालिकेचे क्षेत्रातील निवासी मालमत्ता धारकांना मनपातर्फे वैयक्तिक अपघाती विमा संरक्षण दिल्यास विहीत मुदतीमध्ये मालमत्ता कर जमा होण्यास मदत होईल. या विषयाची माहिती उपायुक्त गणेश शेटे यांनी आज महासभेत दिली.

  • पालिका क्षेत्रातील निवासी मालमत्ता धारकांस अपघाती विमा संरक्षण देण्याच्या विषयास.
  • पनवेल महानगरपालिका हद्दीतील कळंबोली येथील सेक्टर ११ मधील भुखंड क्र. ६सी/१ (कम्युनीटी सेंटर) क्षेत्र १४९९.९३ चौ.मी. या ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य सभागृह उभारणेच्या प्रस्तावास.
  • पनवेल महानगरपालिका हद्दीत खारघर, कळंबोली, कामोठे व नविन पनवेल, तळोजा, नोड मधील दैनिक बाजार विकसित करण्याच्या विषयास.
  • पनवेल महानगरपालिका मालकीच्या पनवेल येथील अं. भू.क्र. २४७ मधील व्यापारी संकुल १ व २ येथे छतावर पत्राशेड उभारणे व व्यापारी संकुल १, २ व ३ मध्ये दुरुस्ती व रंगकाम करणेबाबतचा विषय.
  • पनवेल महानगरपालिका हद्दीतील महानगरपालिकेच्या मुख्यालयाला संरक्षण भिंत बांधणे व प्रवेशद्वार बांधणे.
  • मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटकातील अनाथ मुलींच्या विवाहाकरीता अर्थसहाय्य करणे.
  • महिला व बालकल्याण विभागातर्फे १ किंवा २ मुलीवर (कुटुंब नियोजन) शस्त्रक्रिया करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याबाबत.
  • दिव्यांग विकास विभाग अंतर्गत दिव्यांग व्यक्तीच्या विवाहाकरिता अर्थसहाय्य देणे तसेच दिव्यांग कल्याण विभागातर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांना व्यवसायिक/पदवीत्तर शिक्षणासाठी वैद्यकीय, अभियांत्रिकी, पी.एच.डी व एम.बी.ए असे शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना देण्याच्या विषयास.
  • समाज विकास विभाग अंतर्गत पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील आर्थिक दुर्बल घटकातील मागासवर्गीय एकल महिलांच्या १० वी व १२ वी चे शिक्षण घेत असलेल्या मुलांना शिष्यवृत्ती देणे.
  • समाज विकास विभागा अंतर्गत १२ वी नंतरचे वैद्यकिय (एम.बी.बी.एस. बी.ए.एम.एस. बी.एच.एम.एस. बी.डी.एस) या सारखे (पूर्ण वेळ) उच्च शिक्षण घेत असलेल्या गुणवत्ता प्राप्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्काचे अर्थसहाय्य देण्याच्या.
  • पनवेल महानगरपालिका दिव्यांग कल्याण विभागा अंतर्गत कुष्ठरोग बांधवांना औषध उपचारासाठी व उदर निर्वाहासाठी देण्यात येणाऱ्या निर्वाह भत्त्यात वाढ.
  • कन्या शाळा येथील जागेवर नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतीमध्ये भरविण्यात येणाऱ्या शाळेस ‘स्वर्गवासी लोकनेते दि.बा पाटील’ असे नाव देण्याचा एकमताने निर्णय महासेभेने घेतला.
  • मा. आयुक्त पनवेल महानगरपालिका यांना शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित (सिडको) यांचे कायमस्वरुपी सदस्यत्व मिळणेबाबतच्या प्रस्ताव शासनास सादर करणे व त्यास मान्यता मिळण्याच्या विषयास महासभेने मंजूरी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -