Sunday, April 27, 2025
Homeक्रीडामिलरने मागितली राजस्थान रॉयल्सची माफी; व्हायरल झालेले ट्विट

मिलरने मागितली राजस्थान रॉयल्सची माफी; व्हायरल झालेले ट्विट

कोलकाता (वृत्तसंस्था) : आयपीएलच्या क्वालिफायर सामन्यात गुजरातच्या डेव्हिड मिलरने शेवटच्या षटकात सलग तीन षटकार मारत संघाला विजयापर्यंत नेत राजस्थानला पराभवाचा धक्का दिला.

रोमांचक वळणावर आलेल्या या सामन्यात त्याने ३८ चेंडूंत पाच षटकार आणि तीन चौकार लगावत नाबाद ६८ धावा करून आपल्या पूर्वाश्रमीच्या संघाला फायनलमध्ये जाण्यापासून रोखले. त्यामुळे सामना संपल्यानंतर लगेचच मिलरने ट्विटरवर ‘सॉरी राजस्थान रॉयल्स’ असे म्हणत त्यांची माफी मागितली. २०२० आणि २०२१ या दोन हंगामात मिलर रॉयल्स संघात होता; परंतु तो अनेक सामन्यांमध्ये संघाचा भाग नव्हता.

मिलरच्या ट्वीटला प्रतिसाद देत, राजस्थान रॉयल्सने लोकप्रिय शो “तारक मेहता का उल्टा चष्मा” मधील एक मिम शेअर केला आहे ज्यामध्ये लिहिले आहे, “दुष्मन ना करे दोस्त ने वो काम किया है.”

आयपीएल २०२२ मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी न विकल्या गेलेल्या डेव्हिड मिलरला गुजरात टायटन्सने ३ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. त्याच्यावर राजस्थान रॉयल्सनेही बोली लावली होती.

या सामन्यात रॉयल्सच्या १८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना डेव्हिड मिलर (नाबाद ६८) आणि पंड्या (नाबाद ४०) यांच्या चौथ्या विकेटसाठी १०६ धावांच्या अखंड भागीदारीमुळे टायटन्सने तीन चेंडू राखून तीन बाद १९१ धावा करत विजय मिळवला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -