लीडर ऑफ बॅक ऑफिस

  51

दीपलक्ष्मी पडते


परिवार’ सगळ्या वारांपैकी महत्त्वाचा वार म्हणजे परिवार! ज्याचा परिवार उत्तम तो माणूस फुलेल, बहरेल. त्याचा वेणू अगदी गगनी झळाळेल! असेच काहीसे घडले आमच्या दादांचे...


श्री. नारायणरावजी राणेसाहेब यांचे रहस्य म्हणजे आदरणीय ‘सौ. निलमताई नारायणराव राणे’ आमच्या वहिनीसाहेब.
त्यांच्याबाबत लिहिताना, बोलताना वाक्य, शब्द शोधावे लागत नाहीत. आपोआप सुचत जातात, उलट शब्दमर्यादा असेल, तर याची कसरत एवढे खरे.


सौ. निलम नारायण राणे म्हणजेच सर्वांच्या लाडक्या वहिनीसाहेब. राजकीय व सार्वजनिक जीवनात यशाचे उत्तुंग शिखर गाठलेल्या, माननीय राणे साहेबांच्या मागे त्या भक्कमपणे उभ्या राहून त्यांना प्रत्येक पायरीवर साथ दिली. जीवनसाथी कसा असावा, याचा धडा आदर्श त्यांनी घालून दिला आहे. कोणत्याही यशस्वी राजकीय नेत्याचे बॅक ऑफिस महत्त्वाचे असते. राणे साहेबांनी राजकारणात विविध पदे उपभोगताना, जनतेची सेवा करताना संस्थांचे जाळे निर्माण केले.

पडवे येथील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल कणकवलीत इंजिनीअर कॉलेज, पशू वैद्यकीय महाविद्यालय, महिला भवन ही शिक्षणाची आणि विकासाची भव्य केंद्रे उभारली आहेत. ही संकुले उभारताना सौ. निलमताई यांनी खारीचा नाही, तर घारीचा वाटा उचलला. बारीक सारीक गोष्टींवर लक्ष ठेवले. या संस्थांमध्ये काम करणारे अधिकारी, कर्मचारी यांची नेहमी काळजी घेतली आणि घेत आहेत. राणे साहेबांच्या ऑफिसच्या लीडर म्हणून निलमवहिनी नेहमी यशस्वी ठरल्या. याचे आम्ही साक्षीदार झालोत, हे आमचे भाग्यच.


वहिनीसाहेब म्हणजे जणू ‘कस्तुरीच’ दादांची. आजकालच्या धावपळीच्या युगात एकदा मानसन्मान, पद, भूषणे, आभूषणे, संपत्ती, स्थैर्य असताना स्थिर कसे राहावे हे वहिनींकडून शिकावे. एवढे साध्य झाले. अध्यात्माच्या जोरावर. यामुळेच त्यांची योग्य निर्णय क्षमता आहे. कारण, त्या कानावर विश्वास कधी ठेवत नाहीत. व्यक्तीची कार्यक्षमता बघतात. कान भरणाऱ्यांना इथे थारा नाही.


घरातच चंद्र, सूर्य, तारे, चांदण्या असताना या सर्वांची सांगड घालणे यासाठी अशी धरणी माताच हवी. हे सर्वसामान्य स्त्रीचे काम नाही.


गृहिणी सारे गृह जिचे ऋणी, ही अशी गृहिणी!
या अशा विविध रूपांत नटलेल्या नवदुर्गेस माझा सलाम!!


वहिनीसाहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!

Comments
Add Comment

आता रेल्वे इंजिनांची निर्यात

प्रा. सुखदेव बखळे कधी काळी तंत्रज्ञान आणि मोठमोठ्या सुविधांसाठी परदेशावर अवलंबून असलेला भारत आता

प्रदेशाध्यक्षपदी कोकणपुत्र भाजपायी...!

माझे कोकण : संतोष वायंगणकर चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर भाजपाचा प्रदेशाध्यक्ष कोण होणार याची चर्चा सुरू

जनता पार्टी आणीबाणीनंतर...

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर इंदिरा गांधींनी २५ जून १९७५ ते मार्च १९७७ या काळात देशावर लादलेल्या आणीबाणीत

हवामान बदलाशी सामना : भारताचा ११ वर्षांचा चढता आलेख

भूपेंद्र यादव मानवनिर्मित हवामान बदलाचे परिणाम सध्या संपूर्ण जगभर जाणवू लागले आहेत. आंतरसरकारी हवामान बदल

आक्रमक सत्ताधारी अन् दिशाहीन विरोधक

महाराष्ट्रनामा : सुनील जावडेकर आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या

नारीशक्तीची डिजिटल भरारी

सावित्री ठाकूर प्रगतीची नवी व्याख्या पूर्वी डिजिटल साक्षरता मोठ्या शहरांपर्यंतच मर्यादित होती, मात्र तिची