Sunday, August 31, 2025

कपिल सिब्बल यांची काँग्रेसला सोडचिट्ठी

कपिल सिब्बल यांची काँग्रेसला सोडचिट्ठी

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी काँग्रेस पक्षातील बदलांचा आग्रह सोडत वेगळा मार्ग चोखाळला आहे. कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देऊन समाजवादी पार्टीच्या पाठिंब्यावर राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे.

समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यावर राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरताना कपिल सिब्बल यांच्यासोबत सपाचे प्रमुख अखिलेश यादव देखील होते. यावेळी सिब्बल यांनी सांगितले की त्यांनी १६ मे रोजीच काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. सपाकडील आमदारांचे संख्याबळ पाहता कपिल सिब्बल राज्यसभेत निवडून जाणे निश्चित आहे.

Comments
Add Comment