Wednesday, September 17, 2025

टेक्सासमध्ये प्राथमिक शाळेत अंदाधुंद गोळीबार

टेक्सासमध्ये प्राथमिक शाळेत अंदाधुंद गोळीबार

टेक्सास : अमेरिकेतील टेक्सासमध्ये एका प्राथमिक शाळेत माजी विद्यार्थ्याने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात १८ विद्यार्थी आणि तीन शिक्षकांचा मृत्यू झाला. तर १३ विद्यार्थी जखमी असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. रॉब एलिमेंट्री स्कूल असे गोळीबार झालेल्या शाळेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टेक्सासच्या उवाल्ड शहरात १८ वर्षीय माजी विद्यार्थ्याने आपल्या आजीला गोळी घातली. त्यानंतर त्याने आपला मोर्चा रॉब एलिमेंट्री शाळेकडे वळवला. शाळेत येताना त्याने एका वाहनालाही धडक दिली. शाळेत घुसण्यापूर्वी या हल्लेखोराने बुलेटप्रुफ जाकेट घातले होते. त्याच्या हातात बंदुक होती. शाळेतील वेगवेगळ्या वर्गात जाऊन त्याने अंदाधुंद गोळीबार केला.

दरम्यान, शाळेत घडलेल्या या घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी दु:ख व्यक्त केले आहे. जे लोक कायदा मोडून हातात बंदूक घेतात, त्यांना आम्ही माफ करणार नाही,’ असे बायडन यांनी म्हटले आहे. तसेच नव्याने बंदुकींवर बंदी आणण्यासंबंधी भाष्य केले आहे. आज अनेक आई-वडील आपल्या मुलांना पुन्हा पाहू शकणार नाहीत. मुलांना गमावण्याची ही वेदना आपल्या शरिरातून आत्मा काढून घेण्यासारखी आहे, असेही बायडेन म्हणाले.

Comments
Add Comment