Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

मुंबईत दुचाकीस्वारासह पाठीमागे बसणाऱ्यालाही हेल्मेट सक्तीचे

हेल्मेट न वापरल्यास ५०० रुपये दंड आणि ३ महिने लायसन्स निलंबित करण्याची तरतूद


मुंबई : मुंबईत विनाहेल्मेट दुचाकी चालवण्याचे प्रमाण वाढल्यामुळे आता दुचाकी चालकासह पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट बंधनकारक करण्याचा निर्णय मुंबई वाहतूक पोलिसांनी घेतला आहे.


दुचाकीस्वार आणि त्याच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने हेल्मेट परिधान केलेले नसेल तर कारवाई केली जाईल, अशी माहिती देणारे पत्रकच मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेने काढले आहे.


मोटार सायकल चालवणारी आणि त्याच्या पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीनेही हेल्मेट परिधान करणे हे वाहन कायदा १९८८ कलम १२६ सह १९४ (ड) अन्वये बंधनकारक आहे. विनाहेल्मेट मोटारसायकल चालविल्यास वाहन कायद्यामध्ये ५०० रुपये दंडाची तरतूद आहे. तसेच तीन महिन्यांसाठी लायसन्स निलंबीत करण्याची तरतूद आहे, असे मुंबई पोलिसांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.


मुंबई वाहतूक पोलिसांच्या या परिपत्रकानुसार या नियमाची अंमलबजावणी तात्काळ सुरू करण्यास सांगितले आहे. तर याविरोधातील कारवाई १५ दिवसांनंतर सुरू करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

Comments
Add Comment