Monday, December 2, 2024
Homeदेशमुलाने मुलाशी लग्न केले तर कोणी जन्माला कसे येईल?

मुलाने मुलाशी लग्न केले तर कोणी जन्माला कसे येईल?

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे खळबळजनक वक्तव्य

पाटणा : जर एखाद्या मुलाचे दुसऱ्या मुलाशी लग्न झाले तर कोणी जन्माला येईल का? जर मुलींची संख्या कमी झाली तर मुले कशी जन्माला येणार. मुलांची लग्ने कशी होणार?, असे सवाल उपस्थित करत बिहारचे मुख्यमंत्री यांनी लैंगिकतेच्या विषयावर खळबळजनक वक्तव्य केले.

पाटणा येथील मगध महिला महाविद्यालयाच्या नवीन वसतिगृहाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी लैंगिकतेच्या विषयावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, आईशिवाय मुलांचा जन्म कसा होईल. आईच जन्मली नाही तर मुले कशी जन्म घेतील. लग्न केले तर मूल होते, मात्र जर हुंड्यासारख्या गोष्टींमध्ये आपण अडकून राहिलो तर मुलांची लग्ने कशी होणार? त्यामुळे या प्रथेला आपण विरोध केला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात महिलांच्या मागणीनुसार दारूंबदी केली आहे. त्याचप्रमाणे लग्नातील हुंडाबंदी होणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कार्यक्रमादरम्यान त्यांच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, आम्ही महाविद्यालयात शिक्षण घेत असताना एकही मुलगी शिकण्यासाठी नव्हती. कुणी महिला विद्यार्थीनी महाविद्यालयात आलीच तर सगळेजण उठून तिला पाहत असत. मात्र आता अनेक मुली मेडिकल आणि इंजिनिअरिंगसारखे उच्च शिक्षण घेत आहेत. त्यामुळे मुली प्रगती करत आहेत.

महिलांच्या मागणीप्रमाणे बिहार राज्यात सरकारने दारूबंदी केली आहे. राज्यातील बालविवाह आणि हुंडा याबाबतही कायदे केले आणि त्या प्रथा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. मागील वर्षी आणि यंदा यासंदर्भात निर्णय घेतला आहे. लग्नासाठी मुलीकडून हुंडा घेणे हे योग्य आणि कायदेशीर नाही, असेही ते म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -