Friday, October 24, 2025
Happy Diwali

सांगलीत इनामधामणी गावात विधवा पुनर्विवाहाचा ऐतिहासिक ठराव मंजूर

सांगलीत इनामधामणी गावात विधवा पुनर्विवाहाचा ऐतिहासिक ठराव मंजूर

सांगली (वार्ताहर) : विधवा महिलांना सौभाग्यालंकार कायम ठेवण्याचा ठराव विविध ठिकाणी होत आहे. असे असताना सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यातील इनामधामणी ग्रामपंचायतीने विधवांच्या पुनर्विवाहाला पाठिंबा देत पुनर्वसनाची जबाबदारी घेण्याचा ऐतिहासिक ठराव मंजूर केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाडचा आदर्श समोर ठेवत जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये विधवा महिलांना सन्मान देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. त्याचबरोबर सांगली महापालिकेच्या महासभेसमोरही हा प्रस्ताव पुढील बैठकीत घेण्यात येणार आहे.

विधवा महिलांना सौभाग्यालंकार कायम ठेवण्याचे ठराव केले जात असताना मिरज तालुक्यातील इनामधामणी ग्रामपंचायतीने विधवा महिलांच्या पुनर्विवाहाच्या हक्काला पाठिंबा देऊ केला आहे. त्याचबरोबर या महिलांना संसारोपयोगी साहित्य देऊन महिलांना पूनर्वसनासाठी मदत करण्यात येणार आहे. सरपंच आश्विनी कोळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपसरपंच अनिता पाटील यांनी विधवांना पुनर्विवाह करण्यास सहमती देण्याचा ठराव मांडला.

या ठरावाला सदस्या राजमती मगदूम यांनी अनुमोदन दिले. विशेष म्हणजे पुनर्विवाह करणाऱ्या विधवा महिलांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत घेणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >