Friday, July 19, 2024
Homeमहामुंबईसिडकोतर्फे ९०८ कांदळवन क्षेत्र वन विभागाकडे हस्तांतरित

सिडकोतर्फे ९०८ कांदळवन क्षेत्र वन विभागाकडे हस्तांतरित

नवी मुंबई (प्रतिनिधी) : सिडकोतर्फे एकूण सुमारे ९०८ हेक्टर कांदनवळाखालील जमिनीच्या हस्तांतरणाबाबतची प्रक्रिया मंगळवारी पूर्ण करण्यात आलेली आहे. यापैकी २७९ हेक्टर जमीन सिडकोच्या ताब्यात असून उर्वरित ६२९ हेक्टरकरिता ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे. सिडकोस कांदळवनाखालील जमीन वन विभागास हस्तांतरित करणेबाबत पर्यावरण विभागाकडून निर्देश देण्यात आलेले होते. “पर्यावरण रक्षण आणि संवर्धन उपक्रमांस सिडकोने नेहमीच सहकार्य केले आहे. याचाच एक भाग म्हणून नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कांदळवन क्षेत्राचे वन विभागास हस्तांतरण करण्यात आले आहे.”

या प्रसंगी डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको, विरेंद्र तिवारी, अति. प्रधान मुख्य वनसंरक्षक, कांदळवन कक्ष, महाराष्ट्र, डॉ. कैलास शिंदे, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, रवी कुमार, मुख्य नियोजनकार, सिडको आणि आदर्श रेड्डी, उपवनसंरक्षक, कांदळवन कक्ष हे प्रामुख्याने उपस्थित होते.

सिडको महामंडळाच्या ताब्यात असलेली ठाणे तालुक्यातील सुमारे १४५८ हेक्टर कांदळवनाखालील क्षेत्र यापूर्वीच वनविभागाकडे हस्तांतरित करण्यात आलेली आहे. पर्यावरण मंत्र्यांनी दिलेल्या निर्देशांनुसार, एकूण सुमारे ९०८ हेक्टर कांदनवळाखालील जमीनीचे हस्तांतरणाबाबतची प्रक्रीया सिडकोतर्फे पूर्ण करण्यात आली आहे. यापैकी २७९ हेक्टर जमीन सिडकोच्या ताब्यात असून उर्वरित सिडकोच्या ताब्यात नसलेल्या जमीनीकरिता ना-हरकत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. आतापर्यंत सिडकोने पनवेल आणि उरण तालुक्यांतील कांदळवनाखालील जमिनीचे हस्तातंरण पूर्ण केले असून नवी मुंबईतील संपूर्ण कांदळवन क्षेत्राचे हस्तातंरण करण्याची प्रक्रिया सिडकोने पूर्ण केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -