Saturday, December 14, 2024
Homeक्रीडालखनऊ-बंगळूरुमध्ये आरपारची टक्कर

लखनऊ-बंगळूरुमध्ये आरपारची टक्कर

आज एलिमिनेटर सामना

कोलकाता (वृत्तसंस्था) : बुधवारी लखनऊ सुपर जायंट्स आणि प्लेऑफमध्ये प्रवेश केलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु यांच्यात एलिमिनेटर सामना होणार आहे. या दोन्ही संघांनी अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर लीग साखळीतील टप्पा पूर्ण केला. एलिमिनेटर खेळणाऱ्या दोन संघांपैकी एकाचा प्रवास या सामन्यातील पराभवाने संपणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक असलेल्या या सामन्यात आरपारची टक्कर अनुभवण्यास मिळू शकते.

या हंगामात दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमने-सामने येतील. याआधी साखळी टप्प्यात दोन्ही संघांत सामना पाहायला मिळाला होता, ज्यामध्ये बंगळूरुने लखनऊचा दणदणीत पराभव केला होता. पण आता प्लेऑफच्या मोठ्या टप्प्यावर स्पर्धेचे दडपण वेगळेच असणार आहे, दोन्ही संघ आपला शेवटचा सामना जिंकून प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत.

आयपीएल २०२२ ची सुरुवात लखनऊ सुपर जायंट्ससाठी खास नव्हती. संघाला पहिल्याच सामन्यात गुजरातकडून पराभव स्वीकारावा लागला होता. पण या पराभवानंतर केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघाने वेग पकडला आणि त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. गेल्या काही सामन्यांमध्ये लखनऊला टेबल टॉपर बनण्याची विशेष संधी होती. मात्र, शेवटच्या ३ सामन्यांपैकी २ गमावून त्याने ही संधी गमावली.

कोलकाताविरुद्ध लखनऊने साखळी टप्प्यातील शेवटचा सामना खेळला. या सामन्यात केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक यांनी आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च सलामी भागीदारी करत २१० धावा केल्या होत्या. पण हे लक्ष्य वाचवण्यात संघाच्या गोलंदाजांची तारांबळ उडाली, अखेरीस एविन लुईसच्या अप्रतिम झेलने लखनऊच्या पारड्यात हा सामना गेला. अशा स्थितीत एलिमिनेटरमध्ये संघाच्या गोलंदाजांवर विजयाची जबाबदारी असणार आहे. दुसरीकडे, आयपीएल सुरू होण्यापूर्वी चॅलेंजर्सचा टॉप-४ चा संघ म्हणून कोणीही विचार केला नव्हता. पण संघातील अनकॅप्ड खेळाडूंनी ज्या प्रकारे आपला खेळ उंचावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे, तो पूर्णपणे वाखाणण्याजोगा आहे. यामध्ये रजत पाटीदार आणि शाहबाज अहमद हे सर्वात मोठे सकारात्मक मुद्दे समोर आले आहेत. त्यांच्यासोबतच अनुभवी दिनेश कार्तिकनेही आपल्या धमाकेदार कामगिरीने सर्वांना चकित केले आहे.

शेवटच्या सामन्यापूर्वी या संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीची बॅट शांत होती. बंगळूरुसाठी सर्वात मोठा दिलासा म्हणजे शेवटच्या साखळी सामन्यात विराटने शानदार ७३ धावा केल्या. शिवाय या सामन्यात फाफ

डु प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनीही संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. आता एलिमिनेटर सामन्यात बंगळूरुच्या विजयासाठी या तिन्ही खेळाडूंचे चालणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासोबतच या मोसमातील आतापर्यंतच्या दोन्ही संघांच्या कामगिरीनुसार केएल राहुलचे पारडे जड असल्याचे दिसते. कारण, या मोसमात लखनऊचा संघ दुसऱ्या स्थानी गेलेल्या राजस्थानपेक्षा अधिक संतुलित दिसत आहे.

ठिकाण : ईडन गार्डन्स, कोलकाता वेळ : रात्री ७.३० वाजता

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -