Wednesday, July 17, 2024
Homeमहामुंबईसंभाजीराजे भूमिकेवर ठाम; शिवसेनेची नाकारली ऑफर

संभाजीराजे भूमिकेवर ठाम; शिवसेनेची नाकारली ऑफर

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे यांना पक्ष प्रवेशाची दिलेली ऑफर त्यांनी नाकारली असून ते अपक्ष लढणार ठाम आहेत. गेल्या काही दिवसांपासून संभाजी राजे शिवसेना प्रवेश करणार अशा चर्चा सुरू होत्या. त्याला आता ब्रेक लागण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यसभेची निवडणूक अटीतटीची होणार आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेचे राजकारण शिगेला पोहोचले आहेत शिवसेनेने दोन जागा लढवण्याचा निर्धार केला आहे, तर छत्रपती संभाजीराजे देखील इच्छुक आहेत. मात्र संभाजीराजे यांना राज्यसभेवर जाण्यासाठी ४२ मतांची गरज आहे. महाविकास आघाडी सरकारमुळे शिवसेनेचे मताधिक्य पूर्ण होणार आहे. संभाजी राजेंनी शिवसेनेत यावे अशी अट घालण्यात आली आहे. सोमवारी दुपारी बारा वाजता संभाजीराजेंना वर्षा निवासस्थानी बोलवण्याचे निमंत्रण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते; परंतु संभाजी राजेंनी शिवसेनेची ऑफर नाकारल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे संभाजीराजेंची राज्यसभेवर जाण्याची वाट खडतर बनण्याची शक्यता आहे.

अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम असलेल्या संभाजीराजांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दोन वेळा भेट घेतली. दोन्ही वेळा शिवसेनेकडून संभाजीराजेंना सेनेतून राज्यसभेवर जाण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र संभाजीराजे अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्यासाठी ठाम आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दोन्ही वेळी घेतलेल्या भेटी निष्प्रभ ठरल्या आहेत.

संभाजीराजे अपक्ष लढणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी त्यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी मराठा संघटनांकडून सुरू आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि एकनाथ शिंदे, नाना पटोले यांच्या मराठा संघटनांकडून भेटीगाठी घेतल्या. महाविकास आघाडी सरकारमधील सर्वांनी शिवसेनेला पाठिंबा दर्शवला आहे. मराठा आमदार देखील सेनेच्या पाठीशी उभे आहेत. मराठा संघटनांकडून यामुळे राजकीय पक्षांवर निवडणुकांची भीती दाखवत दबाव वाढवला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -