गाडीचा टायर फुटून झालेल्या अपघातात एक ठार, दोन जखमी

नवीन पनवेल (वार्ताहर) : एका चारचाकी गाडीचा टायर फुटून झालेल्या अपघातात गाडीतील एक ठार, तर दोघे जखमी झाल्याची घटना पनवेलजवळील पुणे - मुंबई एक्स्प्रेस लेनवर सोमवारी सकाळी घडली आहे.


चालक कल्पेश शेवाळे (वय २७) हा त्याच्या ताब्यातील व्हॅगनर गाडी घेऊन पुणे बाजूकडून मुंबईच्या दिशेकडे जाताना पनवेलजवळील पुणे-मुंबई एक्स्प्रेस लेनवर त्यांच्या गाडीचा एक टायर फुटला. गाडीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात गाडीत असलेला त्याचा मोठा भाऊ तेजस शेवाळे (वय २८) हा जखमी होऊन मयत झाला आहे.


तर तेजसची पत्नी सोनल व कल्पेश हे दोघे जखमी झाले आहेत. अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

बेस्टच्या ताफ्यातील बस क्रमांक १८६४ ला भावपूर्ण निरोप

मुंबई  :  मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या बेस्ट उपक्रमातील शेवटची मोठ्या आकाराची JNNURM बसगाडी

अभिनेत्री तेजस्विनी लोणारीचा साखरपुडा संपन्न! राजकारण सक्रीय असलेल्या कुटुंबाची होणार थोरली सून

मुंबई: बिग बॉस मराठी ४ मधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली अभिनेत्री तेजस्विनी लोणारी लवकरच बोहल्यावर चढणार आहे.

मध्य रेल्वेद्वारे दिवाळी आणि छठ उत्सवानिमित्त विशेष सेवा

मुंबई (प्रतिनिधी): मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांनी सांगितले की, मध्य रेल्वेद्वारे २८ ऑक्टोबर २०२५

आजपासून मुंबईत 'इंडिया मेरीटाईम सप्ताह', केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई (प्रतिनिधी) : शंभराहून अधिक देशातील एक लाखापेक्षा अधिक प्रतिनिधी, ५०० प्रदर्शक, २०० पेक्षा अधिक तज्ज्ञ

दिवाळीनंतर मुंबई–पुणे–कोल्हापूर मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

मुंबई : दिवाळी सुट्टीनंतर परतीचा प्रवास आता मुंबई, पुणे आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठी

सलमान खानच्या रियाधमधील भाषणावर वाद: पाकिस्तानच्या दहशतवादी यादीत नाव असल्याचे दावे खोटे

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या अलीकडील एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमातील विधानामुळे सोशल मीडियावर वाद