नवीन पनवेल (वार्ताहर) : एका चारचाकी गाडीचा टायर फुटून झालेल्या अपघातात गाडीतील एक ठार, तर दोघे जखमी झाल्याची घटना पनवेलजवळील पुणे – मुंबई एक्स्प्रेस लेनवर सोमवारी सकाळी घडली आहे.
चालक कल्पेश शेवाळे (वय २७) हा त्याच्या ताब्यातील व्हॅगनर गाडी घेऊन पुणे बाजूकडून मुंबईच्या दिशेकडे जाताना पनवेलजवळील पुणे-मुंबई एक्स्प्रेस लेनवर त्यांच्या गाडीचा एक टायर फुटला. गाडीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात गाडीत असलेला त्याचा मोठा भाऊ तेजस शेवाळे (वय २८) हा जखमी होऊन मयत झाला आहे.
तर तेजसची पत्नी सोनल व कल्पेश हे दोघे जखमी झाले आहेत. अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.