Saturday, August 30, 2025

शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी संजय पवार यांचे नाव फायनल

शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी संजय पवार यांचे नाव फायनल

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेवर कोल्हापूरचे शिवसेनेचे कट्टर समर्थक संजय पवार यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. संजय पवार हे कडवट समर्थक आहेत. या मावळ्याला आम्ही राज्यसभेची उमेदवारी देण्यासंबंधी निर्णय घेतला आहे. फायनल घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील, असे संजय राऊत यांनी सांगितले.

दोन्ही जागा शिवसेनच्या आहेत. दोन्ही जागांवर शिवसेना लढेल आणि दोन्ही जागांवर सेनेचे उमेदवार जिंकून येतील. कोल्हापुरचे संजय पवार गेली ३० वर्ष शिवसैनिक आहेत. कडवट सैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. पक्का मावळा आहे आणि मावळे असतात म्हणून राजे असतात, हे ही लक्षात घ्या... राजांना पक्षाचं वावडं असू नये, अशी कमेंट संजय राऊत यांनी केली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा