Saturday, May 10, 2025

ठाणेमहत्वाची बातमी

केतकी चितळेची पोलीस कोठडीनंतर आता न्यायालयीन कोठडीत रवानगी

केतकी चितळेची पोलीस कोठडीनंतर आता न्यायालयीन कोठडीत रवानगी

ठाणे : गेल्या काही दिवासांपासून सोशल मीडियावर केतकी चितळे हे नाव चांगलच चर्चेत आले आहे. आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी दिवसेंदिवस तिच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. नुकतेच समोर आलेल्या माहितीनुसार, केतकी चितळे ला 7 जून पर्यंत ठाणे कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


२०२० मध्ये बौद्ध धर्माविषयी समाजमाध्यमावर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केतकीवर रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. केतकीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.


हा गुन्हा दोन वर्षांपूर्वी झाला होता. तसेच केतकीचा जबाब रबाळे पोलिसांनी यापूर्वीच घेतला होता. त्यामुळे तिला पोलीस कोठडीची आवश्यता नसल्याचे केतकीच्या वकिलांनी न्यायालयात म्हटले होते. तर, याप्रकरणाचा तपास करणे आवश्यक असल्याचा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला होता. दोन्ही बाजूकडील युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी याप्रकरणी तिला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आता तिला ७ जूनपर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.


तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात सुनावणी पूर्ण झाली असून २६ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.

Comments
Add Comment