मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांनी पीएमएलए विशेष कोर्टात अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर ८ जून रोजी सुनावणी होणार आहे. न्यायालयाने ऋषिकेश देशमुख यांना २७ मे रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात सुनावणी होणार होती. मात्र, काही कारणास्तव सुनावणी होऊ शकली नसल्याने आता या याचिकेवर ८ जून रोजी सुनावणी होणार आहे. मनी लाँन्ड्रिगप्रकरणी त्यांच्यावर ईडी आरोप केला आहे.
न्यायालयाने हृषिकेश देशमुख यांना २७ मे रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. हृषिकेश याचा आर्थिक गैरव्यवहारात सक्रिय सहभाग होता आणि त्याने वडिलांना बेकायदा कमावलेली रक्कम देणगी म्हणून दाखवण्यास मदत केली होती, असा दावा ईडी विशेष न्यायालयात केला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांनी पीएमएलए विशेष कोर्टात अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली आहे.