Friday, July 19, 2024
Homeकोकणरायगडफणसाड अभयारण्यात झाली प्राणिगणना

फणसाड अभयारण्यात झाली प्राणिगणना

बिबट्याच्या पाऊलखुणा, ओरखडे आढळले

मुरूड (वार्ताहर) : कोरोना कहर ओसरल्यानंतर दोन वर्षांनी मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात बौद्ध पौर्णिमादिवशी प्राणिगणना केल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी आर. बी. भोसले यांनी दिली. वनसंपदेने नटलेल्या, पर्यटनात सुप्रसिद्ध असलेल्या ५४ किमी क्षेत्र विस्तार असलेल्या फणसाड वन्यजीव अभयारण्यात बौद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून सोमवार १६ मे ते मंगळवार १७ मे रोजी उपवनसंरक्षक व वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राणिगणना करण्यात आली.

यामध्ये अभयारण्यातील काशिद, सुडकोली व नांदगाव या तीन परिमंडळातील तेरा मचान, वनअधिकारी, कर्मचारी, ग्रीन वर्क्स ट्रस्ट, आऊल फाऊंडेशन, मानद वन्यजीव रक्षक (रायगड) व निसर्गप्रेमी यांनी सहभागी होऊन वन्यप्राणी, पक्षी प्रगणनेचे काम केले. या क्षेत्रात २७ पाणवठे असून वन्यजीवांची प्रगणना करण्यासाठी तेरा मचाण होते. यामध्ये निसर्ग प्रेमीसंस्था देखील सहभागी झाल्या होत्या. रात्रभर जागता पहारा देत ही प्रगणना करण्यात आली.

यावेळी रानडुक्कर, भेकर, ससा, रानमांजर, रानगवा, शेकरु, माकड, वानर, सांबर, खवल्या मांजर या प्राण्यांसह मोर, घार, फ्रांग माऊथ, वटवाघूळ,आर्न बिल,रातवा, भारद्वाज, कोतवाल इ.पक्षीआणि प्राणी गणनेसाठी नोंदी घेत असताना बिबट्याच्या पाऊल खुणा आणि ओरखडे यांच्या नोंदी घेण्यात आल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -