मुंबई (वृत्तसंस्था) : यंदाच्या हंगामातील आयपीएलचा अंतिम सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रविवार २९ मे रोजी खेळला जाणार आहे. या सामन्याला एक आठवडा शिल्लक असतानाच या सामन्याच्या सर्व तिकिटांची विक्री झाली आहे.
यंदा या सामन्याला एक लाखांहून अधिकजण उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. या सामन्याच्या वेळेसंदर्भात काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने महत्त्वाची माहिती दिली होती. २९ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये होणारा आयपीएलचा अंतिम सामना अर्धा तास उशीरा सुरू होणार आहे. म्हणजेच भारतीय वेळेनुसार, रात्री ८ वाजता अंतिम सामना होणार आहे.
साडेसात वाजता नाणेफेक होईल. सध्या साडेसात वाजता आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात होते. मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएलच्या फायनल सामन्यापूर्वी समारोप कार्यक्रम आयोजत करण्यात येणार आहे. यामध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश असणार आहे.
आयपीएलचा क्लोजिंग समारोप २९ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सुरू होणार आहे. हा कार्यक्रम ५० मिनिटांपर्यंत रंगणार आहे. त्यानंतर साडेसात वाजता नाणेफेक होणार आहे. तर आठ वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.