Friday, July 5, 2024
Homeताज्या घडामोडीपुण्यातही ज्ञानवापी सारखा प्रकार

पुण्यातही ज्ञानवापी सारखा प्रकार

पुण्यातील दोन मंदिर उद्ध्वस्त करून दर्गा बांधल्याचा मनसेचा दावा

पुणे : देशभरात हिंदुत्ववादी संघटनांकडून वेगवेगळ्या ठिकाणी मंदिरं उद्ध्वस्त करून मशिदी बांधल्याचा दावा होत आहे. यातील अयोध्या, काशी येथील प्रकरण न्यायालयात पोहचली आहेत. आता या वादाची मालिका पुण्यापर्यंत पोहचली आहे. मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी पुण्यातील पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिरं उद्ध्वस्त करून तेथे बडा शेख दर्गा आणि छोटा शेख दर्गा बांधल्याचा दावा केला आहे. तसेच या प्रकरणी राज्य सरकारने पुरातत्व खात्याचा अहवाल तपासून कारवाई करावी, अशी मागणी अजय शिंदे यांनी केली आहे.

अजय शिंदे म्हणाले, “ज्यांनी आमच्या छत्रपती संभाजी महाराजांना मारले त्या औरंगजेबाचा एक नातू या पुण्यात वारला तेव्हा त्याची कबर बांधण्यात आली. त्याकाळी पुणे शहराचे नाव बदलून नातवाचे नाव देण्याचा प्रयत्न झाला. इतका वाईट इतिहास पुण्यश्वराच्या जागेवर उभ्या असलेल्या दर्ग्याचा आहे. असे असूनही आम्ही त्यावर बोलू नये, असे कोणी म्हणत असेल तर ते अगदी चुकीचे आहे.”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -