Wednesday, March 26, 2025
Homeक्रीडापंजाबचा विजयी शेवट

पंजाबचा विजयी शेवट

हरप्रीत ब्रर, लिव्हींगस्टोन चमकले

मुंबई (प्रतिनिधी) : हरप्रीत ब्ररची अप्रतिम गोलंदाजी आणि लिअम लिव्हींगस्टोनच्या फलंदाजीच्या धडाक्याने लीग टेबलमधील शेवटच्या सामन्यात पंजाबने हैदराबादला धूळ चारत हंगामाचा शेवट विजयाने केला. या विजयामुळे पंजाबने मोसमातील सातवा विजय मिळवला. हैदराबादने दिलेल्या १५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजी आलेल्या पंजाबनेही सांघिक खेळाचे दर्शन घडविले. जॉनी बेअरस्टो, शिखर धवन यांना चांगली सलामी देण्यात यश आले. त्यामुळे पंजाबचा विजय सोपा झाला. पुढे लिअम लिव्हींगस्टोन धडाकेबाज फलंदाजी करत पंजाबला विजय मिळवून दिला.

लिव्हींगस्टोनने २२ चेंडूंत नाबाद ४९ धावांची धडाकेबाज कामगिरी केली. पंजाबने अवघ्या १५.१ षटकांत ५ फलंदाजांच्या बदल्यात १६० धावांचे लक्ष्य गाठले. हैदराबादच्या एकाही गोलंदाजाला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे पंजाबने सहज विजय मिळवला. प्रथम फलंदाजीला आलेल्या हैदराबादला चांगली सुरुवात करता आली नसली तरी सलामीवीर अभिषेक शर्मासह त्रिपाठी, मारक्रम, वॉशिंग्टन सुंदर, रोमारीयो शेफर्ड यांच्या सांघिक खेळीमुळे संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. त्यात अभिषेक शर्माने संघातर्फे सर्वाधिक ४३ धावांचे योगदान दिले.

त्रिपाठी, मारक्रम यांनी अनुक्रमे २०,२१ धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरने २५ आणि रोमारीयो शेफर्डने नाबाद २६ धावांचे योगदान दिले. त्यामुळे हैदराबादला २० षटकांअखेर ८ फलंदाजांच्या बदल्यात १५७ धावांपर्यंत मजल मारता आली. पंजाबच्या हरप्रीत ब्ररने प्रभावी गोलंदाजी केली. त्याने ४ षटकांत अवघ्या २६ धावा देत ३ बळी मिळवले. नॅथन एलीसने ४ षटकांत ३ विकेट मिळवले, पण त्याला धावा रोखता आल्या नाहीत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -