Wednesday, July 24, 2024
Homeदेशपंतप्रधान मोदींचा लेख जपानच्या वृत्तपत्रात प्रकाशित

पंतप्रधान मोदींचा लेख जपानच्या वृत्तपत्रात प्रकाशित

टोकीयो : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जपानच्या @Yomiuri_Online या स्थानिक वर्तमानपत्रामध्ये एक लेख लिहिला असून तो सह-संपादकीय भागात प्रकाशित झाला आहे.

लेखाविषयी ट्वीटर द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ” भारत आणि जपान यांच्यामधल्या सळसळत्या, उत्साही संबंधांविषयी सह-संपादकीय- ऑप एड पानावर लेखन केले आहे. आमची भागीदारी ही शांतता, स्थैर्य आणि समृध्दी यांच्यासाठी आहे. या लेखामध्ये मी उभय देशाच्या मैत्रीच्या प्रवासाला 70 वैभवशाली वर्ष पूर्ण झाली आहेत, यावर विशेष भर दिला आहे.@Yomiuri_Online

कोविड नंतरच्या काळात भारत- जपान अधिक जवळचे आणि महत्वपूर्ण क्षेत्रात सहकार्य करणारे देश आहेत. आपली राष्ट्रे लोकशाही मूल्यांसाठी दृढपणाने वचनबद्ध आहेत. एकत्रितपणे आपण स्थिर आणि सुरक्षित इंडो- पॅसिफिक क्षेत्राचे प्रमुख आधारस्तंभ आहोत. आपण विविध बहुपक्षीय मंचावरही तितक्याच जवळिकतेने कार्य करीत आहोत, याचा मला आनंद आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असल्यापासून मला जपानी लोकांशी नियमित संवाद साधण्याची संधी मिळाली आहे. जपानने विकासाच्या दिशेने वाटचाल करताना चढलेल्या पाय-या नेहमीच वाखाणण्यासारख्या आहेत. पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, नवसंकल्पना, स्टार्टअप्स आणि इतर ब-याच महत्वाच्या क्षेत्रामध्ये जपान आणि भारत यांच्यामध्ये भागीदारी आहे.” पंतप्रधान मोदी सध्या जपानच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -