Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीआता सीबीएसई बोर्डाची वर्षातून एकच परीक्षा होणार

आता सीबीएसई बोर्डाची वर्षातून एकच परीक्षा होणार

सीबीएसईच्या परीक्षेच्या पॅटर्नमध्ये मोठा बदल

मुंबई (प्रतिनिधी) : देशात कोरोना महामारी सुरु झाल्यापासून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) यांच्याकडून दहावी-बारावीच्या परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्यात येत होते. मात्र आता कोरोना महामारी नियंत्रणात आल्यामुळे सीबीएसई बोर्डाकडून परीक्षा पॅटर्नमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. त्यानुसार दहावी-बारावीची वर्षातून एकदाच परीक्षा होणार असल्याची घोषणा सोमवारी बोर्डाकडून करण्यात आली आहे. सीबीएसई बोर्डाच्या या निर्णयामुळे पालकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर झाला आहे.

सीबीएसई दहावी, बारावीची बोर्ड परीक्षांबाबत जुन्या पॅटर्नवर परतली आहे. त्यानुसार आता दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून एकदाच होणार आहेत. गेल्या दोन वर्षांपासून दहावी, बारावीच्या परीक्षा दोन टर्ममध्ये घेतल्या जात आहेत. वर्षातून एकदा परीक्षा घेण्याची तरतूद करण्यासाठी सीबीएसईने यात बदल केला आहे. दहावीच्या परीक्षेत सीबीएसईकडून इतरही अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. ज्यामध्ये आता दहावीतील ४० टक्के प्रश्नांची उत्तरे परीक्षार्थींना त्यांच्या आकलनाच्या आधारे द्यावी लागणार आहेत. जेणेकरुन विद्यार्थ्यांना रटाळ ऐवजी समजुन उत्तर देता येईल. यामध्ये विद्यार्थ्यांकडून कार्यक्रमावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत.

याशिवाय २० टक्के प्रश्न एमसीक्यू आणि ४० टक्के प्रश्न लहान उत्तरांचे असतील. दहावीच्या परीक्षेतील बदल यासोबतच बारावीच्या परीक्षेतही बोर्डाकडून काही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार आता परीक्षेतील ५०% प्रश्न हे लहान आणि दीर्घ उत्तराचे असतील.

त्याच वेळी, ३० टक्के प्रश्न केस स्टडीचे असतील आणि २० टक्के प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील. नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत मंडळाने हे बदल केले आहेत. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना आता रटाळ न करता समजुतीवर सोडले पाहिजे, असे मंडळाचे मत आहे. यासोबतच अंतर्गत परीक्षा पद्धतीत कोणताही बदल केला जाणार नसल्याचेही बोर्डाने स्पष्ट केले आहे. म्हणजेच शाळा ज्या पद्धतीने अंतर्गत परीक्षा घ्यायच्या त्याच पद्धतीने ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. यासोबतच बोर्डाने प्रश्नपत्रिकेच्या पॅटर्नमध्येही बदल केला आहे.

असे असेल प्रश्नपत्रिकेचे स्वरूप

९ वी आणि १० वी, एकूण गुण : १००, आकलनावर आधारित प्रश्नः ४० टक्के, वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्नः २० टक्के, लहान आणि दीर्घ उत्तरे प्रश्न: ४० टक्के

११ वी आणि १२ वी, एकूण गुण: १००, आकलन आधारित: ३० टक्के, वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्नः २० टक्के,लहान आणि दीर्घ उत्तरे प्रश्न: ५० टक्के

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -