Thursday, July 18, 2024
Homeमहत्वाची बातमीनरेंद्र मोदींचे जपानमध्ये जोरदार स्वागत : घोषणांनी विमानतळ दुमदुमले

नरेंद्र मोदींचे जपानमध्ये जोरदार स्वागत : घोषणांनी विमानतळ दुमदुमले

‘आयपीईएफ’मध्ये मोदींनी दिला तीन ‘टी’वर जोवर

टोकिओ (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘क्वाड’ परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानच्या दौऱ्यावर आहेत. मोदी यांचे विमानतळावर आगमन होताच त्यांच्या स्वागतासाठी तेथे उपस्थित असलेल्या भारतियांनी ‘जय श्री राम’ आणि ‘मोदी, मोदी’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. ‘क्वाड’ परिषदेपूर्वी अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या ‘इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क फॉर प्रॉस्पिरिटी’मध्ये नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले. मोदी यांनी ‘ट्रस्ट, ट्रान्सपरन्सी आणि टाइमलीनेस’ म्हणजेच विश्वास, पारदर्शकता आणि समयसूचकता महत्त्वाची असल्याचे यावेळी स्पष्ट केले.

जो बायडन यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, जपानचे पंतप्रधान किशीदा फुमिओ यांच्यासह ऑस्ट्रेलिया, ब्रुनेई, इंडोनेशिया, रिपब्लिक ऑफ कोरिया, मलेशिया, न्यूझीलंड, फिलिपाइन्स, सिंगापूर, थायलँड आणि व्हिएतनाम या देशांचे प्रतिनिधी ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले होते. ‘इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क फॉर प्रॉस्पिरिटी’चे संयुक्त प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे.

‘जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क फॉर प्रॉस्पिरिटीचा ठराव महत्त्वाचा ठरणार आहे’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. भारत हा ऐतिहासिक दृष्ट्या इंडो-पॅसिफिक भागातील व्यापाराच्या केंद्रस्थानी राहिला आहे, गुजरातमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्राचीन केंद्र लोथल येथे असल्याचे तसेच ‘आयपीईफ’मधील देशांमध्ये व्यापारादरम्यान लवचिकता आणि सर्वसमावेशकता आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

इंडो पॅसिफिक भागात भारत नेहमीच मुक्त, खुला आणि सर्वसमावेशक व्यापाराच्या बाजूने राहिला आहे. भारताने सहकाऱ्यांच्या विकासासाठी विकास, शांतता यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. ‘आयपीईएफ’ ही प्रादेशिक आणि आर्थिक संबंध आणि व्यापाराच्या विकासासाठी महत्त्वाची ठरेल, असे मोदी म्हणाले.

दरमयान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानमधील ३० उद्योजकांची भेट घेत त्यांच्याशी विविध मुद्यांवर चर्चा केली. त्यांनी जपानच्या उद्योजकांनी भारतातील बदलत्या धोरणासंदर्भात समाधान व्यक्त केल्याचे म्हटले आहे. नरेंद्र मोदी हे ‘क्वाड’ परिषदेच्यानिमित्त जपानच्या दौऱ्यावर गेले आहेत. जपानमध्ये नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्यात द्वीपक्षीय चर्चा होऊ शकते. त्याशिवाय मोदी हे जपानचे पंतप्रधान किशीदा फुमिओ आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांच्याशी चर्चा करतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -