Tuesday, July 16, 2024
Homeमहामुंबईनशेसाठी वापरला जाणारा कफ सिरपचा मोठा साठा जप्त

नशेसाठी वापरला जाणारा कफ सिरपचा मोठा साठा जप्त

एनसीबीची कारवाई

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई नार्कोटिक कन्ट्रोल ब्युरो विभागाने भिवंडी परिसरात मोठी कारवाई करीत नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कफ सिरपचा साठा जप्त केला आहे. या सर्व साठ्याची किंमत ३५ लाख इतकी असल्याची माहिती समोर आली आहे. एनसीबीकडून सातत्याने अमली पदार्थ विरोधात कारवाया सुरूच आहेत. मुंबईतील भिवंडीच्या आग्रा-मुंबई महामार्गावरील परिसरात शनिवारी (दि. २१) रोजी ही धडक कारवाई करण्यात आली.

एनसीबीच्या मुंबई युनिटने भिवंडी परिसरातून ८६४० नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कफ सिरपच्या बाटल्या जप्त केला आहेत. अचानक इतका मोठा साठा येथे कसा मिळाला, असा सवालही यामुळे उपस्थित होत आहे. यासंदर्भातील अधिकचा तपास एनसीबीने सुरू केला आहे. एनसीबीकडून याबाबतची माहिती देण्यात आली.

याप्रकरणी एनसीबी मुंबई युनिटने दोघांना अटक केली आहे. भिवंडीच्या आग्रा-मुंबई महामार्गावर हा साठा एका गाडीतून येणार असल्याची माहिती एनसीबीला आधी मिळाली होती. त्यानुसार एका संशयित बोलेरो पिकअपची एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी झडती घेतली.

या संशयित वाहनातील ६० बॉक्समध्ये एकूण ८६४ किलो ८६४० कोडीन आधारित कफ सिरप भरलेले आढळले आहे. जप्त केलेल्या या मालमत्तेची एकूण किंमत ३५ लाख रुपये आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एनसीबी अधिकरी या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध घेत आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -