Thursday, July 18, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेड्रग्स प्रकरण चिघळले; खबर देणाराच बनला आरोपी...

ड्रग्स प्रकरण चिघळले; खबर देणाराच बनला आरोपी…

उल्हासनगर (वार्ताहर) : उल्हासनगर शहरात एका बिना नंबरप्लेट मोटरसायकलमध्ये ड्रग्ससदृश्य पदार्थ सापडल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी वाहतूक पोलिसांना खबर देणारा नंदलाल वाधवा व त्याचा मुलगा राम वाधवा हेच मध्यवर्ती पोलिसांच्या फेऱ्यात अडकले आहेत. दरम्यान या प्रकरणी राहुल शर्मा याला अटक करण्यात आली आहे.

उल्हासनगर वाहतूक पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, २८ एप्रिलला मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजेश तलरेजा हा तरुण बिना नंबरप्लेट मोटरसायकल घेऊन फिरतोय. त्यावरून बुधवारी वाहतूक पोलीस तलरेजा याची मोटारसायकल ताब्यात घेण्यासाठी हॉटेलवर गेले. गाडीच्या डिक्कीतून पोलिसांनी राजेशला सर्व साहित्य काढण्यास सांगून गाडी जप्त करत गाडीचे पेपर घेऊन पोलीस स्टेशनला येण्यास सांगितले.

रात्री नऊच्या सुमारास नंदलाल वाधवा तिथे पोहोचले. त्यांनी गाडीत अमली पदार्थ असल्याचे सांगत गाडीची डिक्की खोलण्यास पोलिसांना भाग पाडले. त्यावेळी डिक्कीत एक सफेद पावडरची पुडी आढळून आली. हे ड्रग्स असून गुन्हा दाखल करण्याची मागणी वाधवा यांनी केल्यानंतर वरिष्ठ पो. नि. विजय गायकवाड यांनी हा तपास मध्यवर्ती पोलिसांकडे सोपवला. येथील पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली महेश राळेभात यांनी तपास सुरू केला. राहुल शर्मा या तरुणाने हा सर्व प्रकार घडवून आणला असल्याचे पोलीस तपासात समोर आले असून शर्मा याला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -