मुंबई : सामाजिक माध्यम-डिजिटल संवाद यु-ट्यूब वर 222K सभासदांचा आकडा पार केल्याबद्दल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी आनंद व्यक्त केला.
ट्वीटर द्वारे देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमचा यु-ट्यूब परिवार आता 222K चा झाला आहे! प्रत्येक सदस्य आणि दर्शकांचे आभार! ही संधी साधत यु-ट्यूब ने मला गेल्या वर्षी पाठवलेल्या सिल्व्हर प्ले बटणाची झलक सादर करतो आहे. चला, सतत वृदिंगत होत राहू आणि महाराष्ट्राचे भले करण्याच्या प्रयत्नांशी जोडू या!”
अधिकृत यु-ट्यूब वाहिनी – https://www.youtube.com/c/DevendraFadnavis
देवेंद्र फडणवीसांचे सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर सक्रिय समर्थक आहेत. विविध सामाजिक माध्यमांद्वारे फडणवीस नागरिकांशी संवाद साधत असतात.