मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएलचा पंधरावा हंगाम मुंबईसाठी निराशाजनक राहीला आहे. असे असले तरी शनिवारी मुंबईने दिल्लीवर मात करून हंगामाचा शेवट विजयाने केला. मुंबई आणि दिल्ली यांच्यातील सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने नव्या विक्रमाला गवसणी घातली.
दिल्लीविरुद्ध सामन्यात जसप्रीत बुमराने त्याच्या कारकिर्दीतील १४८वा विकेट घेऊन मुंबईचा माजी गोलंदाज हरभजन सिंहला मागे टाकले आहे. हरभजन सिंहने मुंबई इंडियन्ससाठी १४७ विकेट्स घेतल्या होत्या. या यादीत लसिथ मलिंगा १९५ विकेट्ससह अव्वल स्थानी आहे, तर जसप्रीत बुमरा दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे.
बुमरा हा आयपीएल २०२२मध्ये मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरलाय. याशिवाय, आयपीएलच्या सात हंगामात १५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेऊन मलिंगाच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.