Saturday, October 25, 2025
Happy Diwali

सूर्यफूल बियाणांच्या दरात तिपटीने वाढ

सोलापूर (हिं.स.) खरीप हंगामाला सुरवात होते न होते तोच सूर्यफूल बियाणांचे उत्पादन करणाऱ्या बहुतांश कंपन्यांनी गतवर्षीपेक्षा यंदा बियाणांच्या दरात थेट दीडशे टक्के वाढ केली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. हे बियाणे खरेदी कसे करायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. मान्सूनपूर्व पावसाने मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात समाधानकारकरीत्या हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये गावोगावी सध्या पेरणीची धांदल उडाली आहे.

सूर्यफूल व बाजरीचा पट्टा म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंगळवेढा दक्षिण भागामध्ये सध्या शेतकरी वर्ग बियाणे शोधत दुकानांमध्ये गर्दी करीत आहे. सूर्यफुलाच्या बियाणे निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी दोन किलोच्या प्रति पिशवी मागे गतवर्षीपेक्षा सरासरी दीडशे टक्के दरवाढ केली आहे. सूर्यफुलाच्या चांगल्या प्रतीच्या वाणची किंमत तीन हजार रुपये प्रति दोन किलो पिशवी अशी झाली आहे.

सूर्यफूल बियाणाचा दर एका क्विंटल साठी दीड लाख रुपये झाला आहे. एका एकरासाठी दोन किलो बियाणे शेतकऱ्याला लागते. त्याला ३ हजार रुपये मोजावे लागतात. एक एकर मशागतिसाठी ४ हजार रूपये, पेरणीसाठी एक हजार, कोळपणीसाठी एक हजार, काढणीस ५ हजार, पिकांना पाणी देण्यास २ हजार रूपये मजुरी असा एकूण १५ ते १६ हजार एकरी खर्च येतो.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा