Tuesday, July 16, 2024
Homeताज्या घडामोडीमातोश्रीसमोर हनुमान चालीसा म्हणायला ती काय मशीद आहे का? - राज ठाकरे

मातोश्रीसमोर हनुमान चालीसा म्हणायला ती काय मशीद आहे का? – राज ठाकरे

पुणे (हिं.स.) : पुण्यात आज गणेश कला क्रीडा मंच येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेत ठाकरे यांनी राणा दाम्पत्याचा समाचार घेत निशाणा साधला आहे. मशिदीवरील अनधिकृत भोंगे हटवा ही मागणी आम्ही केल्यानंतर ते राणा दाम्पत्य उठले आणि मातोश्रीसमोर हनुमान चालीसा म्हणायचा हट्ट केला.

अरे मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणायला ती काय मशीद आहे का?”, असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राणा दाम्पत्याला जोरदार चपराक लगावली. पुण्यात गणेश कला क्रीडा येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी भोंग्यांच्या बाबतीतील पुढील आंदोलन, राणा दाम्पत्य, तसेच अयोध्या दौऱ्याला स्थिगिती या सर्वच विषयांवर राज ठाकरे यांनी भाष्य केले.

भोंग्यांच्या बाबतीत मी सांगितले काय की जर मशीदीवरती जोरात बांग दिली तर त्यासमोर जाऊन हनुमान चालिसा लावा. आणि ते राणा दाम्पत्यांने काय केले. मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठणाचा हट्ट.. अरे मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणायला ती काय मशीद आहे का?”, अशा शब्दात राज ठाकरेंनी राणा दाम्पत्याचा समाचार घेतला. हे कोणी केले आणि यानंतर लडाखला संजय राऊत आणि राणा भेटले यावरूनच पहा हे कोणी केलं असं देखील यावेळी ठाकरे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -