Tuesday, May 13, 2025

क्रीडा

प्रज्ञानानंदकडून कॉर्लसनला पराभवाचा धक्का

प्रज्ञानानंदकडून कॉर्लसनला पराभवाचा धक्का

चेन्नई (वृत्तसंस्था) : १६ वर्षीय बुद्धिबळपटू रामबाबू प्रज्ञानानंदने विश्व विजेता मॅग्नस कॉर्लसनला पराभवाचा धक्का दिला. रामबाबू प्रज्ञानानंदची कार्लसनवर दुसरा मोठा विजय आहे. प्रज्ञानानंदने विश्व विजेत्या कार्लसनला चेजबल मास्टर्सच्या ५व्या फेरीत पराभूत केले.


चेजबल मास्टर्सच्या पाचव्या फेरीत नॉर्वेच्या कार्लसनने मोठी चूक केली. त्याचा फायदा घेत भारताच्या रामबाबू प्रज्ञानानंदने कार्लसनवर मात केली. सुरुवातीला हा सामना ड्रॉच्या दिशेने जात होता. पण ४०व्या मूवमध्ये कार्लसनने काळ्या घोड्याला चुकीच्या ठिकाणी नेऊन ठेवले. त्यानंतर भारतीय खेळाडूने त्याला पुनरागमन करण्याची संधीच दिली नाही आणि कार्लसनवर मोठा विजय मिळवला.


१५० हजार अमेरिकी डॉलर (१.१६ करोड रुपये) अशा मोठ्या रोख रकमेचे पारितोषिक असणाऱ्या या स्पर्धेत दुसऱ्या दिवसानंतर रामबाबू प्रज्ञानानंदचे १२ गुण झाले आहेत. विश्व विजेता कार्लसन या स्पर्धेत दुसऱ्या स्थानी आहे.

Comments
Add Comment