
अॅड. रिया करंजकर
आपल्या नातेवाइकांचे मेसेज एवढे नसतील एवढे मेसेज दररोज आपल्याला बँकेकडून येत असतात तसंच आपल्या नातेवाइकांचे एवढे फोन नसतील एवढे फोन बँकेचे आपल्याला येतात. कर्ज घ्या, क्रेडिट कार्ड घ्या, असे फोन व मेसेज आपल्याला येतात. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, एटीएम कार्डमुळे आपल्या खिशातील पॅकेटचे वजन कमी झाले आणि कार्डने त्याची जागा व्यापून घेतली. या कार्डचे जेवढे फायदे असतात, तेवढे नुकसान सामान्य माणसांकडे हे कार्ड नाही, त्या माणसांना मागासलेली माणसं असे लोक समजू लागले.
हे कार्ड वापरताना अनेक सावधगिरी बाळगावी लागते, नाही तर आपल्याकडील असलेल्या पीनमुळे आपली असलेली रक्कम बँकेतील वजा होऊ शकते, याची अनेक उदाहरणं समोर येत आहेत. राजेश आणि श्रद्धा सर्वसामान्य माणसं. साधं आयुष्य. राजेशचा स्वतःचा व्यवसाय, तर श्रद्धा प्रायव्हेट स्कूलमध्ये टीचर. दोघांच्या मिळकतीत त्यांच्या तीन मुलांचा संसार चालू होता. महिन्याच्या अखेरीस आर्थिक बाबींमध्ये सर्वांची ओढाताण होते. तशी या कुटुंबाची होत असे. मैत्रिणींच्या सल्ल्यानुसार व बँकेचे येत असलेल्या मेसेजमुळे श्रद्धा आणि राजेशने ठरवलं की, आता आपण एक क्रेडिट कार्ड घेऊ या. लोक बोलतात, चांगलं असतं यावर विश्वास ठेवून त्यांनी क्रेडिट कार्ड घेण्याचं ठरवलं. लोकांची मदत घेण्यापेक्षा बँकेचं क्रेडिट कार्ड असलेलं बरं, असं त्या दोघांना वाटू लागलं. श्रद्धाचे पेमेंट अॅक्सिस बँकमध्ये व्हायचे. त्या बँकेकडून तिला क्रेडिट कार्ड मिळालं. कारण त्या बँकेत तिचं पेमेंट अकाऊंट होतं. राजेश आणि श्रद्धा जेवढा क्रेडिट कार्डचा वापर करायचे, तेवढाच वेळ ते कार्डातील काढलेली रक्कम बँकेत भरायची. यामुळे महिना अखेरीस होणारी आर्थिक ओढाताण त्यांची थांबली. कोणाची मदत घेण्याची गरज त्यांना आता वाटू लागली नाही. व्यवहार सगळे सुरळीत चालू होते आणि अचानक त्यांच्या लक्षात आलं की, त्यांचं क्रेडिट कार्ड कुठेतरी गहाळ झालेलं आहे.
दोघांनी आणि मुलाने पुष्कळ शोधलं, पण ते कार्ड कुठेच मिळेना म्हणून राजेश आणि श्रद्धाने बँकेकडे धाव घेतली आणि क्रेडिट कार्ड ब्लॉक करायला सांगितले. बँकेतील मॅनेजर आणि तिथल्या वर्करने सल्ला दिला की, तुम्ही अगोदर तुमचं राहिलेलं बॅलन्स पूर्ण करा आणि मग आम्ही कार्ड ब्लॉक करतो. त्याप्रमाणे श्रद्धा आणि राजेशने राहिलेले ३०००० पूर्ण केले व वरती सतराशे रुपये भरले आणि बँकेच्या मॅनेजरकडून झिरो बॅलन्स असे स्टेटमेंटही त्यांनी मिळवले. जुनं कार्ड कुठे गहाळ झाले आहे, ते ब्लॉक केल्यावर त्यांनी नवीन कार्ड काढण्यासाठी रिक्वेस्ट केली. त्यामुळे त्यांना बँकेकडून नवीन कार्ड उपलब्ध झालं. एक महिन्यानंतर त्यांना बँकेकडून फोन यायला लागला की, तुमचे पुन्हा सतराशे रुपये भरायचे आहेत. त्यावेळी तुमचं कार्ड ब्लॉक होईल. राजेशने सतराशे रुपये भरले व तसे स्टेटमेंट त्याने बँकेकडून घेतले. एक महिन्यानंतर त्यांना कॉल आला.
नको-नको त्या शब्दांत कॉल करणारी व्यक्ती त्यांच्याशी बोलू लागली की, तुम्ही अजून सतराशे रुपये भरायचे आहेत. श्रद्धाचे अकाऊंट क्रेडिट कार्ड असल्याने तिला फोन करून बँकेतील लोक त्रास देऊ लागले. पहिलं कार्ड ब्लॉक केलेले असूनही तिला त्या कार्डचे पैसे भरा, असे सतत फोन येऊन तिला मानसिक त्रास होऊ लागला. ते पैसेही त्यांनी जाऊन भरले. पुन्हा एक महिन्याने त्यांना सतत फोन येऊ लागले की, पुन्हा तुम्ही सतराशे रुपये भरायचे आहेत. या गोष्टीचा श्रद्धाला एवढा मानसिक त्रास झाला की, तिचा बीपी लो होऊ लागला आणि एक नाही दोन नाही सतत फोन येऊ लागले आणि नको नको त्या शब्दांत श्रद्धा आणि राजेशशी वार्तालाप करू लागले.
१७०० रुपयांसाठी बँकेतील कॉल करणारे लोक नको त्या शब्दांमध्ये आपल्या कस्टमरची बोलू लागले होते. यावेळी श्रद्धा आणि राजेशनी आपल्या वकिलांना फोन केला आणि काय करायचं हे त्यांनी विचारलं. वकिलांनी आणि त्यांना योग्य सल्ला दिला की, तुम्ही तुमच्याकडे असलेले सर्व पेपरचे बँकेने पहिल्या कार्डचे अमाऊंट क्लीअर केले होते. त्या झिरो बॅलन्स स्टेटमेंट दिलं होतं, ते तुम्ही पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा सतराशे रुपये भरलेले होते. ते स्टेटमेंट घ्या आणि पोलीस कंप्लेंट करा. ज्या फोनने तुम्हाला फोन येतात, ते फोन तुम्ही पोलिसांना द्या आणि त्याच्या अगोदर तुम्ही बँकेच्या मॅनेजर आणि स्टाफला तसे इन्फॉर्म करा, त्याचप्रमाणे राजेश आणि श्रद्धा प्रथम बँकेत गेले. मॅनेजर आणि तिथला स्टाफला त्यांनी या गोष्टीची माहिती दिली की, बँकेचे कार्ड ब्लॉक करूनही तुम्ही आम्हाला पैसे भरा, असं का सांगता? तरीही आम्ही दोन वेळा सतराशे-सतराशे रुपये भरले आणि परत आम्हाला आता सतराशे रुपये भरा, असा फोन आणि मेसेज का येतात आम्ही सर्व अमाऊंट क्लीअर केली होती आणि कार्ड ब्लॉक करतो, असं तुम्ही सांगितलं होतं आणि तुम्हीच आम्हाला झिरो बॅलन्स स्टेटमेंट दिलेलं होतं आणि काय झालेले आहे, ते ब्लॉक केलेले आहे म्हणून तुम्ही आम्हाला नवीन क्रेडिट कार्ड उपलब्ध करून दिलं होतं. मग मागच्या गहाळ झालेल्या क्रेडिट कार्डबद्दल आम्हाला अमाऊंट भरा, असे फोन आणि मेसेज का येतात, यावर मॅनेजर आणि तिथला स्टाफ काहीच बोलू शकला नाही, फक्त एवढंच बोलले, आम्ही ब्लॉक करतो, याचाच अर्थ असा होतो की, बँका सर्वसामान्य लोकांना फसवत आहेत का? ब्लॉक करा व त्याची अमाऊंट पूर्ण करून बँका लोकांचे कार्ड ब्लॉक करत नाहीयेत. अमाऊंट क्लीअर असतानाही लोकांना व्याज भरा असे मेसेज बँकेकडून लोकांना त्रास देण्यासाठी येत आहेत. बँकेला राजेशने सरळ सरळ धमकी दिली. आठ दिवसांत तुम्ही काम केले नाहीत, तर मी मॅनेजर सकट बँकेच्या स्टापची पोलीस कम्प्लेंट करणार.
क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड घ्या, असे सतत बँकेकडून आपल्याला फोन येतात. आपल्याला विनवणी करतात आणि आर्थिक परिस्थितीमध्ये गुरफटलेला सामान्य माणूस या बँकेच्या आमिषांना बळी पडतो कार्ड घेतो आणि या कार्डाच्या चक्रव्युहामध्ये सामान्य माणूस फसून जातो. बँकेच्या विनाकारण त्रासदायक येणाऱ्या फोनमध्ये सामान्य माणसांच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होतो. आपण बँकेकडून कर्ज घेतलेय की चोरी केली आहे, हा प्रश्न सामान्य जनतेला निर्माण झालेला आहे.
(कथा सत्यघटनेवर आधारित असून नावे बदललेली आहेत.)