Wednesday, January 15, 2025

तिक्त रस

डॉ. लीना राजवाडे

‘स्वयं अरोचिष्णुः अपि अरोचघ्नः’ अशी ज्याची ख्याती आहे तो हा कडू रस. आजच्या लेखात जाणून घेऊयात याविषयी विस्ताराने. कडू चव किंवा रस हा नक्कीच आपण काही आनंदाने खात नाही. गुढीपाडव्याला कडुनिंबाचे पान खायचे तेच महामुश्किलीने. आणखी आजारी पडल्यावर ताप, सर्दी, खोकला झाला की, डॉक्टर देतात ते कडू औषध हे आपल्याला माहिती आहे. यात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, स्वत: कडू असला तरी शरीरातील अपाचित घटकांचे पचन करून शेवट गोड करणारा, तोंडाची चव परत आणणारा हा रस आहे. अग्नी आणि वायू महाभूत प्रधान असा हा रस आहे.

‘त्वक् मांसयोः स्थिरीकरणः’

त्वचा आणि मांस धातू यांचे स्थैर्य टिकवणारा हा रस आहे. त्वचा आणि मांस किंवा चरबी या दोन्ही ठिकाणी क्लेद तयार होण्याची किंवा साठून राहण्याची नैसर्गिक प्रवृत्ती असते. या क्लेदाचे शोषण करण्याचे काम कडू रस करतो. कृमिघ्नः कडू रस खाण्यात ठेवल्यास जंत होत नाहीत. वर सांगितल्याप्रमाणे शरीरात क्लेद वाढला की, पोटात विशेषकरून अन्नपचनाच्या शेवटच्या भागात कृमी तयार होतात. रक्तातही सूक्ष्म कृमी निर्माण होतात ते होऊ नयेत म्हणून कडू रस नेहमी प्रमाणात खाण्यात ठेवल्यास ही प्रवृत्ती नियंत्रणात राहायला मदत होते.

अत्युपयुज्यमानः तिक्तो रसः कर्शयति भ्रमयति वदनं उपशोषयति।कडू रस प्रमाणापेक्षा जास्त खाल्यास शरीर रोडावते. चक्कर येते, तोंडालाही कोरड पडते. जेवणात मधुर रसाच्या तुलनेत कमी प्रमाणात, ते ही शेवटी ह्या रसाचे सेवन करावे. सुरुवातीलाच किंवा शेवटीसुद्धा जास्त प्रमाणात हा रस खाल्यास रस आणि मांस धातू आणि शरीराला धारण करणारे धातू गुणात किंवा प्रमाणात कमी होतात. चलन-वलन प्रक्रिया अधिक वेगात होतात. वात व्याधी होण्याची शक्यता वाढते.

तिक्त रसाची द्रव्ये-हळद, पडवळ, कारले, शेंगांमधील धान्ये मूग, चवळी, मसूर, कढिपत्ता धातूंपैकी लोह धातूमध्ये हा रस असतो. लोखंडी भांड्यात अन्नपदार्थ बनवल्यास हा रस मिळतो. हळद, कढिपत्ता याविषयी वेगळे लिहिण्याची गरज नाही. अनेक पाककृतीमध्ये नित्य याचा समावेश केला जातो. तिक्त रसाविषयी सध्याही संशोधन चालू आहे. काही संशोधनातून सिद्ध झालेल्या गोष्टी जाता जाता नमूद करते.

TAS2R# gene mediates bitter taste. Flavonoids, phenols, glucosidases are active ingredients which are antioxidants and anticarcinogenic.

BMI stays in normal range with Bitter things in diet. Bitter things help in controlling obesity, chronic disease because of poor nutrition.

व्यवहारात उपयोगात आणण्यासारखे उपाय –

सकाळी हळद, कडुनिंब याचे चूर्ण, साधे तीळतैलाचे पाच-सहा थेंब मिसळून हिरड्या व दाताला हलके मसाज करून लावावे. दोन किंवा तीन मिनिटांनी पाण्याने तोंड स्वच्छ धुवावे. रोज हे केल्यास नक्की फायदा होऊ शकेल. पाचकस्राव चांगले तयार होतील. पचन मुळातून सुधारेल. वाढणारी रक्तातली साखर नियंत्रणात यायला सुरुवात होईल. असा हा स्वत: कडू पण स्वास्थ्य टिकवायला चांगला रस नक्कीच अधिक सजगतेने आहार कल्पनेत आपण वापरू, अशी आशा वाटते.

(पुढील लेखात पाहू, तिखट रसाविषयी…)

आजची गुरुकिल्ली

स्वत:ची चव चांगली नसली तरी कडू रस खाल्ल्याने तोंडाची अरूची नाहीशी होते.

तिक्तं स्वयं अरोचिष्णुःअरुचिं जयेत्

([email protected])

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Previous article
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -