Wednesday, July 17, 2024
Homeमहामुंबईराज्य सरकारने सुडाचे राजकारण बंद करावे

राज्य सरकारने सुडाचे राजकारण बंद करावे

संदीप देशपांडे यांचा हल्लाबोल

मुंबई (प्रतिनिधी) : महिला पोलीस अधिकारी जखमी प्रकरणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणात न्यायालयाकडून संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर झाल्यानंतर ते शुक्रवारी सर्वांसमोर आले.

संदीप देशपांडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती दिली आणि महिला पोलीस अधिकाऱ्याला माझा धक्का लागल्याचे एकजरी फुटेज मला तुम्ही दाखवले तर मी या क्षणाला राजकारण सोडून देईन, असे संदीप देशपांडे म्हणाले. “एक गोष्ट लक्षात घ्या. आज तुमचे दिवस आहेत. उद्या आमचे असतील. त्यामुळे राज्य सरकारने आधी हे असले सूडाचे राजकारण बंद करावे, असे देशपांडे म्हणाले.

देशपांडे पुढे म्हणाले की, त्या दिवशी जे घडलं ते सर्वांनी पाहिलं आहे. जर त्या पोलीस भगिनी माझ्या किंवा माझ्या कारच्या धक्क्याने पडल्या असतील असं जर फुटेज तुम्ही मला दाखवलंत तर मी राजकारण सोडून देईन. माझा किंवा कार्यकर्त्यांच्या धक्क्याने त्या पडलेल्या नव्हत्या. तरीही माझ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला गेला. आम्ही काय चोर किंवा दहशतवादी आहोत का? आम्हाला पकडण्यासाठी इतका दबाव पोलिसांवर का आणला जात होता?”, असा सवाल उपस्थित करत संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -