
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला विश्वचषक स्पर्धेपूर्वी हॉकी इंडियाने एफआयएच प्रो लीगसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. अनुभवी गोलकीपर सविता पूनियाकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. रानी रामपालचे पुनरागमन करण्यात आले आहे. नवोदीत खेळाडू बलजीत कौरला संधी देण्यात आली आहे. ही महिला लीग जूनमध्ये बेल्जियम आणि नेदरलँड येथे खेळविण्यात येणार आहे.
भारतीय संघ आपला पहिला सामना ११ आणि १२ जूनला यजमान बेल्जियमविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर १८ आणि १९ जूनला दुसरा सामना अर्जेंटीनाशी होणार आहे. त्यानंतर २१ आणि २२ जूनला भारत युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकाशी दोन हात करेल.
संघाची कमान अनुभवी गोलकीपर सविता पूनियावर सोपविण्यात आली आहे. संघात युवा आणि अनुभवी खेळाडू असे समतोल मिश्रण आहे. ज्युनियर विश्वचषक स्पर्धेतील स्टार खेळाडू बिच्चू देवी, इशिका चौधरी, अक्षिता ढेकले, बलजीत कौर, संगीता आणि दीपिका यांना संघात संधी देण्यात आली आहे.