Saturday, July 20, 2024
Homeदेशमांसाहारी मुलांना लठ्ठपणाचा धोका अधिक

मांसाहारी मुलांना लठ्ठपणाचा धोका अधिक

टोरंटा इथल्या एका संशोधनातून बाब समोर

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : शाकाहारी मुलांचे वजन मांसाहारी मुलांपेक्षा निम्म्याहून कमी असू शकते. दोन ते पाच वर्षं वयोगटातल्या मुलांवर केलेल्या अभ्यासात अन्नामुळे असे होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. टोरंटो इथल्या सेंट मिशेल्स हॉस्पिटलच्या नेतृत्वात केलेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे.

संशोधनात शाकाहारी मुलांची उंची, बीएमआय आणि पोषण हे मांस खाणाऱ्या मुलांइतकेच होते. संशोधकांनी संशोधनात ९ हजार मुलांचा समावेश केला. यामध्ये एकूण २५० शाकाहारी मुलांचा समावेश होता. या मुलांची उंची, बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) आणि पोषण मांस खाणाऱ्या मुलांइतकेच होते; पण बीएमआयची गणना केली तेव्हा शाकाहारी मुलांचे वजन कमी असण्याची शक्यता ९४ टक्के भरल्याचे आढळून आले. ७९ टक्के शाकाहारी मुलांचे वजन योग्य असल्याचे संशोधनात आढळले.

मांसाहार करणाऱ्या ८७०० मुलांपैकी ७८ टक्के मुले वयानुसार योग्य असल्याचे संशोधनात आढळून आले. वयोमानानुसार कमी वजन असलेल्या मुलांकडे पाहिले असता केवळ तीन टक्के मांसाहारी मुलांचे वजन कमी असल्याचे आढळून आले.

या आधारावर शास्त्रज्ञांनी सांगितले की, शाकाहारी मुलांचे वजन कमी असण्याची शक्यता जास्त असते. मांसाहार करणाऱ्या मुलांचे वजन जास्त असू शकते. मांस खाणाऱ्या मुलांमध्ये लठ्ठपणा वाढण्याचा धोका अधिक असल्याचेही संशोधनात आढळून आले. शाकाहारात मुलांच्या विकासासाठी आवश्यक पोषकतत्वांचा अभाव असतो.

जास्त प्रमाणात शाकाहारी असल्यामुळे आशियातल्या मुलांचे वजन कमी असते. भारतातल्या मुलांच्या विकासाचे प्रमाण वेगळे आहे. या अभ्यासात सहभागी असलेले बालरोगतज्ज्ञ डॉ. जोनाथन मागुरी म्हणाले, भारत आणि अमेरिकेतल्या मुलांच्या विकासाचे प्रमाण वेगळे आहे. भारतातल्या पाच वर्षांच्या मुलीचे वजन १७ किलो, उंची १०८ सेंटीमीटर असायला हवी, असेही संशोधक सांगतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -