Thursday, July 18, 2024
Homeदेश'एनएसई' घोटाळा प्रकरणी 'सीबीआय'चे देशभरात धाडसत्र

‘एनएसई’ घोटाळा प्रकरणी ‘सीबीआय’चे देशभरात धाडसत्र

मुंबई, दिल्लीसह १० शहरांमधील बड्या ब्रोकर्सवर छापे

मुंबई : राष्ट्रीय शेअर बाजार ‘एनएसई’ को-लोकेशन गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज शनिवारी २१ मे रोजी मुंबई, दिल्लीसह १० शहरांमधील बड्या ब्रोकर्स आणि गुंतवणूकदारांवर छापे घातले आहेत. या प्रकरणी एनएसईच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण आणि आनंद सुब्रमण्यम यांना यापूर्वीच अटक केली असून ते कोठडीत आहेत.

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या को लोकेशन गैरव्यवहार प्रकरणी ‘एनएसई’च्या माजी सीईओ आणि एमडी चित्रा रामकृष्ण आणि माजी मुख्य परिचालन अधिकारी आनंद सुब्रमण्यमला यापूर्वीच अटक केली होती. त्यांच्यावर आरोपपत्र देखील दाखल करण्यात आले आहेत. सीबीआयकडून या प्रकरणी तपास केला जात आहे.

एनएसईच्या अल्गोरिदमचा गैरवापर करुन ब्रोकर्स आणि ट्रेडर्सनी गैरव्यवहार केला असल्याचे तपासात आढळून आले आहे. को-लोकेशन सुविधेला गैरफायदा उचलत या ब्रोकर्सनी अमाप नफा कमवला असल्याचे सीबीआयच्या तपासात आढळून आले आहे. फ्युचर्स आणि आॅप्शन प्रकारात करण्यात आलेल्या गुंतवणुकीतून नफा कमावला असल्याचा संशय आहे. त्यानुसार सीबीआयकडून आज विविध शहरांमध्ये ब्रोकर्स आणि ट्रेडर्सवर धाडी टाकण्यात आल्या आहेत.

आज शनिवारी सकाळपासून सीबीआयची तपास पथकं मुंबई, दिल्ली, गुडगांव, गांधीनगर, कोलकाता, नोएडा या शहरातील ब्रोकर्सच्या घरी आणि कार्यालयांमध्ये कसून चौकशी करत आहेत. एनएसई को लोकेशन प्रकरणी सक्तवसुली संचनालयाने (ईडी) २०१८ मध्ये मनी लाँडरिंग प्रतिबंधात्मक कायदयाअंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -