नवी दिल्ली : सर्वसामान्य महिलांना घरगुती गॅस परवडत नसल्याने त्यांनी रस्त्यावर चुली मांडून आंदोलने केली. हे सर्व लक्षात घेऊन महिला वर्गाला दिलासा देण्यासाठी पहिल्या १२ सिलेंडरपर्यंत २०० रुपये प्रति सिलेंडर अनुदान देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
Also, this year, we will give a subsidy of Rs 200 per gas cylinder (upto 12 cylinders) to over 9 crore beneficiaries of Pradhan Mantri Ujjwala Yojana: Union Finance Minister Nirmala Sitharaman
— ANI (@ANI) May 21, 2022
त्यामुळे ९ कोटी उज्ज्वला योजना धारकांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे दरवर्षी जवळपास सहा हजार कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. मात्र, या निर्णयामुळे माता-भगिनींची विस्कटलेली आर्थिक गणितं स्थिर होण्यास मदत होणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या.