Saturday, July 20, 2024
Homeताज्या घडामोडीमानसिक आरोग्य सुधारायचेय; घ्या सोशल मीडियापासून ब्रेक

मानसिक आरोग्य सुधारायचेय; घ्या सोशल मीडियापासून ब्रेक

मुंबई (प्रतिनिधी) : आज जगातले बहुतेक लोक सोशल मीडिया ॲप्स नक्कीच वापरत आहेत. त्यामुळे ते तणाव, चिंता, नैराश्य अशा मानसिक आजारांना बळी पडत आहेत. हे आजार टाळण्यासाठी आरोग्यतज्ज्ञ डिजिटल डिटॉक्सची संकल्पना शोधत आहेत. अलीकडेच, इंग्लंडच्या बाथ विद्यापीठातल्या संशोधकांनी एका संशोधनात सांगितले आहे की, सोशल मीडियापासून फक्त एक आठवडा ब्रेक घेतल्याने मानसिक आरोग्य सुधारू शकते. म्हणजेच उदासीनता आणि चिंता या लक्षणांशी झुंज देणाऱ्यांचा त्रास फक्त एका आठवड्यात कमी होऊ शकतो.

तज्ज्ञांच्या मते, ज्याप्रमाणे लोकांना दारू आणि सिगारेटचे व्यसन लागते, त्याचप्रमाणे आभासी जगात राहण्याचीही सवय होते. इच्छा असूनही त्यांना त्यातून बाहेर पडता येत नाही. अशा परिस्थितीत स्वत:ला तंत्रज्ञानाच्या विळख्यातून दूर ठेवण्यासाठी काही काळ डिजिटल सुट्टीवर जाण्याला ‘डिजिटल डिटॉक्स’ म्हणतात. यासंदर्भात संशोधन करणाऱ्यांना आढळून आले की मानसिक आरोग्य स्केलवर एक आठवडा ब्रेक घेणाऱ्या गटाचे आरोग्य ४६ वरून ५५.९३ पर्यंत वाढले.

संशोधकांनी या संशोधनात १८ ते ७२ वयोगटातल्या १५४ लोकांचा समावेश केला होता. ते दोन गटांमध्ये विभागले गेले. पहिल्या गटाला ‘सोशल मीडिया’वर बंदी असताना दुसऱ्या गटाने नेहमीप्रमाणे ‘सोशल मीडिया’चा वापर सुरू ठेवला. सहभागींनी ‘सोशल मीडिया ॲप्स’ खेळण्यासाठी आठवड्यातून सरासरी आठ तास घालवले. एका आठवड्याच्या संशोधनानंतर, सहभागींच्या तीन चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये नैराश्य आणि चिंतांशी संबंधित प्रश्नांचा समावेश होता. रुग्णांच्या आरोग्य प्रश्नावलीवर त्यांची नैराश्य पातळी ७.४६ वरून ४.८४ वर आल्याचे आढळले. या स्केलवर, चिंता ६.९२ ते ५.९४ पर्यंत होती.

‘सोशल मीडिया’पासून एक छोटा ब्रेक देखील उपयुक्त आहे. ब्रिटनमध्ये १६ ते ४४ वयोगटातले ९७ टक्के लोक सोशल मीडिया ॲप्स वापरतात. संशोधक जेफ लॅम्बर्ट सांगतात की, फक्त एका आठवड्यात पहिल्या गटातल्या लोकांचा मूड सुधारला आणि चिंतेची लक्षणे कमी झाली. याचाच अर्थ असा की सोशल मीडियाच्या छोट्या ब्रेक्सचाही मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. सोशल मीडिया वापरकर्त्यांची संख्या २०११ मध्ये ४५ टक्क्यांवरून २०२१ मध्ये ७१ टक्के झाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -